कोल्हापूर : पोलीस दलाच्या नियमानुसार जिल्ह्यातील 194 पोलीस अंमलदार यांच्या बदल्या पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केल्या आहेत. शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील पदनिहाय बदली आदेश काढले आहेत.
सहाय्यक फौजदार – 11, पोलीस हवालदार – 22, पोलीस नाईक – 41, पोलीस शिपाई – 120 अशा एकूण 194 पोलीस अंमलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, ज्या पोलीस अमलदारांचे वैद्यकीय कारणास्तव, मुलाचे शिक्षण, वैयक्तिक अडचण तसेच सेवानिवृत्त होणारे पोलीस अंमलदार असे सुमारे 80 पोलीस अंमलदार यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. बदली धोरणानुसार विनंती बदल्याचे आदेश काढलेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.