टेंभुर्णी : आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा ताण तणावाचे जीवन जगत आहे. तसेच चुकीचा आहार घेऊन आपले शरीर बिघडत असल्याचे दुर्लक्षित होत आहे. माणसाने तंदुरुस्त शरीर व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व मानसिक संतुलन व्यवस्थित राखण्यासाठी गड किल्ले ट्रेकिंग व निसर्ग भ्रमंती करून आपले जीवन आनंदी बनवावे. तसेच चुकीचा आहार न घेता योग्य आहार घेऊन आपले शेंद्रिय शरीर सुदृढ राखावे, असे मत माढा तालुक्याचे सभापती तुकाराम ढवळे यांनी राजगड ट्रेकिंगवेळी मांडले.
ते संकेत फिटनेस स्टुडिओ यांचे वतीने नववर्षानिमित्त आहार आणि व्यायामाचे महत्त्व यासाठी राजगड ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी ते राजगडावरील बालेकिल्ला येथे बोलत होते.
संकेत फिटनेस स्टुडिओचे संकेत वाघस्कर-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वतीने नववर्षानिमित्त नागरिकांमध्ये तंदुरुस्त शारीर आणि योग्य आहार घेण्यासाठी जनजागरण मोहीम राजगडावर करण्यात आली. यावेळी 25 सदस्यांनी यामध्ये सहभागी होऊन किल्ल्यावर किल्ल्यावर येणार्या प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच योग्य आहार कशा पद्धतीने घ्यावा त्यामुळे आपले शरीर सुदृढ राहील. कुठल्याही आजाराला बळी पडेल याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली.
यावेळी गुंजवणी मार्गे किल्ले ट्रेकिंगला सुरुवात केल्यानंतर ग्रुपचे सदस्य रमेश देशमुख यांनी एक तास दहा मिनिटांमध्ये किल्ला सर केला. तसेच इतर सर्व टीमने किल्ला सर करून आरोग्य विषयी जनजागृती केली यामध्ये बंडु नाना ढवळे,सुरज देशमुख,रमेशआंबा देशमुख,सोमनाथ नलावडे,संतोष वाघमारे,नागेश तोडकरी,दिलीप बिचितकर,समाधान ढेरे,गणेश चौगुले,आर एस पाटील,संतोष जाधव,विलास कोठावळे,विजय खटके, काका पराडे, गणेश व्यवहारे आदिजणांनी मोहिमेत सहभाग घेतला.