राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. परंतु काही ठिकाणी अद्यापही कोरोनाचं संक्रमण कमी झालेलं नाहीये. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून निर्बंध आणि शिथिलांची नियमावली जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये अनेक गोष्टी खुल्या करण्यात आल्या असून काही गोष्टींवर अद्यापही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, दिवाळी ते नाव्हेंबर पर्यंतच्या अखेरीस नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, हे आमचं लक्ष आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईत १०० टक्के लसीकरण पूर्ण करू, असं मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले आहे.
एका वृत्तवाहिनीशी दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, आम्ही दरदिवशी ८०० ते १००० इतक्या लोकांचं लसीकरण करत आहोत. म्हणजेच एका दिवसाला १.८ लाख नागरिकांचं लसीकरण होत आहे. तसेच खाजगी हॉस्पिटल सुद्धा उत्तमरित्या काम करित आहेत. त्यांच्याकडूनही पहिल्या दिवसापासून लसीकरण आणि प्रत्येक गोष्टींमध्ये सहकार्य मिळत आहे. त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. असं इकबाल सिंह चहल म्हणाले.
त्याचप्रमाणे दिवाळीपर्यंत जवळपास ९५ टक्के लोकांचे दोन डोस पूर्ण होतील. दिवाळी ते नाव्हेंबर पर्यंतच्या अखेरपर्यंत नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होतील, हे आमचं लक्ष आहे. परंतु आम्ही दिवाळीपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईत १०० टक्के लसीकरण पूर्ण करू, असं चहल यांनी म्हटलं आहे.
[read_also content=”देशाच्या राजकारणात ट्विटरकडून हस्तक्षेप, काँग्रेस नेते राहुल गांधी संतापले https://www.navarashtra.com/latest-news/do-not-interrupt-in-the-politics-of-country-by-the-twitter-says-rahul-gandhi-nrms-168598.html”]
पुढे त्यांनी म्हटलं की, नागरिकांचं दोन्ही डोस पूर्ण झाल्यास आम्ही सर्व गोष्टी खुल्या करण्याचा निर्णय घेणार आहोत. असेही चहल यांनी सांगितलं आहे.