मुंबई : लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचा छंद असतो. अनेकांना गाण्याचे वेड असते, तर काहींना संगीताची आवड असते. अनेकांना नृत्य करायला आवडते. मात्र, याच छंदापाई कधीकधी एवढी फसगत होते की, त्याची चर्चा सगळीकडे व्हायला लागते. आजकाल सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे या फसगतीचे व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या एका महिलेच्या पोल डान्सची हौससुद्धा चर्चेचा विषय ठऱतेय. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोल डान्स करताना या महिलेची चांगलीच फजिती झाली आहे.
व्हिडिओमधील महिलेला डान्स करण्याची चांगलीच हौस असल्याचं दिसतंय. तिची डान्सची आवड जपण्यासाठी ती घरातच डान्स करत आहे. घरातील एक पोलवर ती ‘पोल डान्स’ करत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय त्या प्रमाणे ही महिला पोलवर यशस्वीपणे चढली आहे. पोलवर चढल्यानंतर ती डान्स करणे सुरु करतेय.
मात्र, याच वेळी अचानकपणे तिचा तोल गेला. तोल गेल्यामुळे ही महिला उभ्या असलेल्या पोलला घेऊन बाजूच्या डायनिंग टेबलवर जोरात पडली आहे. यावेळी टेबलवर ठेवलेले सगळी भांडी तिच्या अंगावर तसेच इतरत्र विखुरली आहेत. पोल डान्स करताना पडल्यानंतर ती घरातील इतर सदस्यांना मदतीसाठी बोलावत आहे. डान्स करण्याच्या नादामध्ये ती चांगलीच जखमी झाल्याचं दिसतंय.
https://twitter.com/HldMyBeer/status/1394049991694594054
दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओला पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये. Hold My Beer या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करताच, तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २७ हजार लोकांनी पाहिला असून अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.