Yuvraj Singh will Definitely Become The Head Coach of Gujarat Titans
Yuvraj Singh Come Back in New Role : भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंह आपल्याला नवीन रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. गुजरात टायटन्सच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत युवराज सिंह दिसणार आहे. गुजरात टायटन्स सध्या खराब परिस्थितीमधून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच गुजरात टायटन्सला हार्दिकने रामराम केल्यानंतर शुभमन गिलला कर्णधारपदी बसवण्यात आले. परंतु, आता गुजरातचा हेडकोच आशिश नेहरा टायटन्सला अखेरचा रामराम करण्याच्या तयारीत आहे. परंतु, आता ही जबाबदारी युवराज सिंह भरून काढणार आहे.
गुजरात टायटन्सला बसणार मोठा धक्का
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चॅम्पियन गुजरात टायटन्स संघाचा २०२५ हे चौथे वर्ष असणार आहे. या चार वर्षांत संघाला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या पर्दापणातच चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. यानंतर अवघ्या दोन वर्षांतच कर्णधार हार्दिक पंड्याने संघ सोडला, त्यानंतर ही जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली. आता पुढील हंगामात संघाला अजून एका धक्क्याला सामोरे जावे लागणार आहे.
आयपीएल हंगामापूर्वी संघ सोडणार
आशीष नेहरा जे गुजरात टायटन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत ते आता आगामी आयपीएल हंगामापूर्वी संघ सोडणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत विक्रम सोळंकीही संघ सोडण्याच्या तयारीत आहे. आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी हे दोघेही गुजरातमधील पदार्पणाच्या मोसमापासून संघासोबत आहेत. गुजरातने आयपीएलच्या पहिल्याच मोसमात विजेतेपद पटकावून सर्वांना आश्चर्यचकित केले. या यशामागे संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांचे महत्त्वाचे योगदान होते. अशा स्थितीत नेहराने संघ सोडल्यास गुजरातसाठी तो एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नसेल. नेहरापूर्वी संघाचा माजी कर्णधार हार्दिक पंड्याही या संघापासून वेगळा झाला होता. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या मोसमात गुजरातची कामगिरी अत्यंत खराब दिसली.
युवराज सिंग संघात दाखल होऊ शकतो
आशिष नेहराच्या गुजरात टायटन्समधून बाहेर पडल्यानंतर, माजी भारतीय वेगवान गोलंदाज युवराज सिंह गुजरात टायटन्सचा नवा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो, असे बोलले जात आहे. नेहराला पर्याय म्हणून युवराज सिंहचे आगमनही संघासाठी चांगले ठरू शकते, परंतु नवीन कोचिंग स्टाफमुळे खेळाडूंमधील समतोल राखण्यास वेळ लागू शकतो. युवराज सिंह त्याच्या काळातील सर्वात मजबूत खेळाडूंपैकी एक होता. टीम इंडियाला 2007 चा T20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकून देण्यात युवराजने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा परिस्थितीत युवराज आपल्या कोचिंग कारकिर्दीतही चमत्कार घडवेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.
शुभमनसोबत युवीची जुगलबंदी जमणार
शुभमन गिल सध्या गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. युवराज सिंगने लहानपणापासूनच शुभमनला क्रिकेटचे धडे दिले आहे. अशा स्थितीत युवराज सिंग गुजरातचा प्रशिक्षक झाला तर शुभमन गिलला त्याची साथ मिळेल.