फोटो सौजन्य - Social Media
यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डे निमित्त पारंपरिक गिफ्ट्सना बाजूला ठेवत अधिक वैयक्तिक, विचारपूर्वक आणि आकर्षक पर्यायांची निवड करण्याचे आवाहन The Body Shop ने केले आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी केवळ भेटवस्तू नव्हे, तर त्या मागील भावना आणि वैयक्तिक स्पर्श महत्त्वाचा ठरतो, या संकल्पनेवर आधारित खास क्युरेटेड व्ही-डे प्री-किटेड गिफ्ट बॉक्सेस आणि ‘क्रिएट युअर ओन’ (CYO) पर्याय ब्रँडने सादर केले आहेत.
या विशेष श्रेणीत रेडी-टू-गिफ्ट लोकप्रिय उत्पादनांचा समावेश आहे. ‘बेरी लव्हिंग’ गिफ्ट सेटमध्ये स्ट्रॉबेरी सुगंधातील शॉवर जेल, बॉडी योगर्ट आणि बॉडी मिस्ट यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ‘क्युपिड अप्रूव्ह्ड ब्रिटिश रोझ’ गिफ्ट सेटमध्ये शॉवर जेल, बॉडी बटर आणि हँड क्रीमचा समावेश आहे. हे दोन्ही गिफ्ट सेट्स आकर्षक, उत्सवी आणि पुनर्वापर करता येणाऱ्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध असून, भेट अधिक खास आणि लक्षात राहणारी बनवतात.
यंदाच्या सीझनमध्ये जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरलेली ‘ड्यूबेरी’ श्रेणी पुन्हा एकदा उपलब्ध करण्यात आली आहे. फळांच्या ताज्या आणि गोड सुगंधासाठी ओळखली जाणारी ही रेंज गिफ्ट बॉक्सेस तसेच वैयक्तिक उत्पादनांच्या स्वरूपात मिळते. प्रेमदिनाच्या निमित्ताने ही श्रेणी नॉस्टॅल्जिक आणि आनंददायी अनुभव देणारी ठरते. यासोबतच ब्रँडने ‘टोबॅको फ्लॉवर बॉडी मिस्ट’ आणि ‘टोबॅको फ्लॉवर ईओ डी टॉयलेट’ही सादर केले आहेत, जे सुगंधप्रेमींसाठी खास आकर्षण ठरत आहेत. दरम्यान, ‘क्रिएट युअर ओन’ गिफ्ट बॉक्स पर्याय ग्राहकांना बाथ, बॉडी आणि फ्रॅग्रन्स श्रेणीतील उत्पादने स्वतः निवडून वैयक्तिक पद्धतीने गिफ्ट तयार करण्याची संधी देतो. त्यामुळे प्रत्येक भेटवस्तू अधिक खास, व्यक्तीच्या आवडीनुसार आणि भावनांनी परिपूर्ण बनते.
वैयक्तिक स्पर्श, प्रीमियम पॅकेजिंग आणि विविध सुगंध पर्यायांसह द बॉडी शॉप यंदाच्या व्हॅलेंटाइन्स डे साठी सोपे, विचारशील आणि संस्मरणीय गिफ्टिंग पर्याय उपलब्ध करून देत आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी काहीतरी वेगळं आणि खास देण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी हे पर्याय निश्चितच आकर्षक ठरणार आहेत.






