Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

Maharashtra Tourism : महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. इथे फिरण्यासाठी अनेक सुंदर, लोकप्रिय आणि प्राचीन ठिकाणे आहेत, ज्यांना कमी बजेटमध्येही भेट देता येऊ शकते. चला यात कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2026 | 08:25 AM
Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात कमी खर्चात फिरण्यासाठी अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य ठिकाणांचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • या ठिकाणी पर्यटनासोबत स्थानिक संस्कृती, खाद्यपदार्थ आणि वारसा अनुभवण्याची संधी मिळते.
  • विकेंड ट्रिप किंवा बजेट फ्रेंडली सुट्टीसाठी ही ठिकाणे पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हा एक समृद्ध राज्य मानला जातो. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे एक मोठे राज्य आहे ज्यामुळे फिरण्यासाठीही इथे तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळतील. इथे विकसित शहरांपासून गावाकडच्या साध्या जीवनशैलीपर्यंत अनेक गोष्टींचा आनंद पर्यटनामध्ये लुटता येतो. महाराष्ट्र प्राचीन किल्ले, राजवाडे, गुहा, मंदिरे आणि अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. तुम्हलाही जर महाराष्ट्रातील काही प्रमुख ठिकाणांना भेट द्यायची असेल, इथे पर्यटन करायचे असेल तर खालील दिलेली काही ठिकाणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. स्वस्त आणि बजेट फ्रेंडली पर्यटनासाठी ही ठिकाणे फार लोकप्रिय आहेत. चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Travel : भारताच्या या शहराला म्हटलं जात ‘‘पॅरिस ऑफ इंडिया’, इथे पाहायला मिळतो आर्ट आणि कल्चरचा उत्तम संगम

मुंबई

बाॅलिवू़ड फिल्म इंडस्ट्री आणि गेटवे ऑफ इंडियाच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. इथे तुम्ही सिद्धिविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दरगाह, मरीन ड्राइव अशा लोकप्रिय टूरिस्ट स्पाॅट्सना भेट देऊ शकता. यासोबतच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर तुम्ही थंड वातावरण आणि मुंबईच्या स्ट्रीट फूडचाही आनंद लुटु शकता. तुम्ही मरीन ड्राईव्हला भेट देऊ शकता जिथे नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. याशिवाय नेहरु तारांगण, जुहू चौपाटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणांनाही भेट देऊन तुम्ही तुमची ट्रीप संस्मरणीय करु शकता.

अजिंठा आणि एलोरा लेणी

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरात गुफेच्या आत अजिंठा आणि एलोरा लेण्या आहेत. या लेण्या भारतातील सर्वात जुन्या ज्ञात प्राचीन शैलकोष्ठ लेण्यांपैकी एक मानल्या जातात. अजिंठा आणि एलोरा या लेण्या एकमेकांपासून १०० किमीच्या अंतरावर आहेत. हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक मानले जाते. इथे तुम्हाला सुबक कोरीवकाम पाहायला मिळेल. या लेण्या ५ व्या ते १० व्या शतकादरम्यान कोरल्या गेल्याची माहिती आहे. सुंदर शिल्पे, चित्रे आणि भित्तिचित्रांनी सुशोभित असलेल्या या लेण्या म्हणजे बाैद्ध, जैन आणि हिंदू स्मारकांचा एक उत्तम संगम मानला जातो. या ठिकाणाला यूनेस्कोच्या जागतिक वारशा स्थळांच्या यादीत देखील सामील करण्यात आले आहे.

पुणे

पुणे हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात लोकप्रिय आणि मोठे शहर मानले जाते. याला ‘सांस्कृतिक राजधानी’ आणि ‘दख्खनची राणी’ म्हणूनही ओळखले जाते. पुणे शहर आपली संस्कृती, ऐतिहासिक किल्ले, समुद्रकिनारे, धबधबा आणि पिकनिक स्पाॅट म्हणून प्रचलित आहे. इथे फिरण्यासाठी आगा खान पॅलेस, पार्वती हिल, राजगड किल्ला, लाल महाल, सिंहगड किल्ला, पेशवा गार्डन्स, शनिवारवाडा, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. पुण्याला गेलात तर इथले काही पारंपारिक पदार्थ चाखायला विसरु नका. यात चितळेंची बाकरवडी, सुजाता मस्तानी, पुणेरी मिसळ आणि एफसी रोडवरील वैशाली आणि रुपाली कॅफे हे फूड स्पाॅट खूप लोकप्रिय आहेत.

शिर्डीचे साई बाबा मंदिर

देशभरात शिर्डीचे साई बाबा मंदिर एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक शहरात वसले असून ते शातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. इथे दररोज मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी जमतात. महान संत साई बाबांचे हे निवासस्थान मानले जाते. मंदिराव्यतिरिक्त इथे अनेक लोकप्रिय आणि सुंदर ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता. यात द्वारकामाई, चावडी, खंडोबा मंदिर, क्षित वाडा संग्रहालय आणि वेट एनॉय वॉटर पार्क या ठिकाणांचा समावेश होतो.

पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत परफेक्ट, मुंबईहून काही अंतरावर दूर… इथे निसर्गाचा लुटता येईल आनंद

पाचगणी

पाचगणी हे महाराष्ट्रातील प्रमुख हिल स्टेशनपैकी एक आहे. हे ठिकाण साधारम १३३४ मीटर उंचीवर आहे ज्यामुळे इथे पोहचल्यावर निसर्गाच्या विहंगम दृष्यांचा आनंद लुटता येतो. ब्रिटिश काळात हे ठिकाणा एक प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय होते. सह्याद्री पर्वतरांगेतील पाच टेकड्यांमुळे या ठिकाणाला पाचगणी असे नाव पडले. इथे तुम्ही कमलगड किल्ला, धाम धरण, मॅप्रो गार्डन, राजपुरी लेणी या ठिकाणांना भेट देऊ शकता. निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी पाचगणी हे ठिकाण कोणत्या स्वर्गाहून कमी ठरणार नाही.

Web Title: 5 most beautiful places to visit in maharashtra for budget friendly travel and weekend trips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:25 AM

Topics:  

  • maharashtra
  • places to visit
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
1

IRCTC घेऊन आला जपान टूर पॅकेज, टोक्योपासून हिरोशिमपर्यंतची मजेदार सफर… जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर
2

Gondiya News: जिल्ह्या तब्बल २८८ ‘एक शिक्षकी’ शाळा! एका शिक्षकाकडे ४ वर्गांचा भार; रिक्तपदांचा अनुशेष वाढतीवर

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, सगळेच घाबरले; नेमकं काय घडलं?
3

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, सगळेच घाबरले; नेमकं काय घडलं?

Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
4

Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे हादरे, जमीन थरथरली अन्…; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.