Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळ जन्मले, पण पुरुष आहे की स्त्री स्पष्ट होईना! मुंबई पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये आठ वर्षांत ६८ अंतर्लिंगी नवजात जन्म

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची नोंद झाली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२५ या कालावधीत एकूण ६८ अशा नवजात बाळांच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 29, 2026 | 11:25 AM
बाळ जन्मले, पण पुरुष आहे की स्त्री स्पष्ट होईना! मुंबई पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये आठ वर्षांत ६८ अंतर्लिंगी नवजात जन्म

बाळ जन्मले, पण पुरुष आहे की स्त्री स्पष्ट होईना! मुंबई पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये आठ वर्षांत ६८ अंतर्लिंगी नवजात जन्म

Follow Us
Follow Us:

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये गेल्या काही वर्षांत इंटरसेक्स म्हणजे अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची नोंद झाली आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२५ या कालावधीत एकूण ६८ अशा नवजात बाळांच्या जन्माची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या नोंदींचे २४ वॉर्डनिहाय किंवा धर्मनिहाय वर्गीकरण उपलब्ध नसल्याचेही या उत्तरातून समोर आले आहे.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: तपासण्या वाढूनही स्तन कर्करोगाचा धोका कमी होईना! कामा रुग्णालयात तीन वर्षांत रुग्णसंख्येत ६८ टक्के वाढ

आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी बीएमसीच्या एफ/दक्षिण विभागाकडे २०२१ ते २०२६ या कालावधीतील अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची वर्षनिहाय, २४ वॉर्डनिहाय आणि धर्मनिहाय माहिती मागितली होती. त्यावर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपलब्ध नोंदीनुसार आकडेवारी दिली आहे. त्यानुसार २०१९ मध्ये २१, २०२० मध्ये १९ आणि २०२१ मध्ये ६ अशा एकूण ४६ जन्मांची नोंद झाली होती. त्यानंतर २०२२ आणि २०२३ मध्ये एकही नोंद नसल्याचे उत्तरात नमूद आहे. मात्र, २०२४ मध्ये १५ आणि २०२५ मध्ये ७, असे आणखी २२ जन्म नोंदविण्यात आले आहेत. त्यामुळे २०१९ ते २०२५ या कालावधीतील एकूण संख्या ६८ वर पोहोचते.

विशेष म्हणजे, अर्जात २४ वॉर्डनिहाय आणि धर्मनिहाय तपशील मागण्यात आला असतानाही महापालिकेच्या उत्तरात केवळ वर्षनिहाय आकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे अंतर्लिंगी नवजात बाळांच्या जन्माची नोंद महापालिका नेमकी कोणत्या पद्धतीने ठेवते आणि २४ वॉर्डांमध्ये त्याचे वितरण किती आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अंतर्लिंगी नवजात जन्म : आकडेवारी

  • २०१९: २१
  • २०२०: १९
  • २०२१: ६
  • २०२२: ०
  • २०२३: ०
  • २०२४: १५
  • २०२५: ७

पॉइंटर्स :

  • सर्वाधिक नोंद : २०१९ मध्ये २१ जन्म
  • २०२२-२३ : एकही जन्म नोंद नाही
  • २०२४-२५ : एकूण २२ जन्मांची नोंद
Breastfeeding: C Section नंतर स्तनपान, सुरुवात सोपी होण्यासाठी सोप्या टिप्स

‘गर्भाची वाढ होत असताना लैंगिक विकासाच्या प्रक्रियेत काही जैविक बदल किंवा कमतरता राहिल्यास बाळाच्या जननेंद्रियांची अथवा लैंगिक वैशिष्ट्यांची रचना नेहमीच्या पुरुष किंवा स्त्री वर्गीकरणापेक्षा वेगळी होऊ शकते. अशा स्थितीला इंटरसेक्स असे म्हटले जाते. मात्र, यामागे नेमके एकच कारण नसते. गुणसूत्रे, हार्मोन्स आणि गर्भातील लैंगिक विकासाची प्रक्रिया यांसारख्या विविध घटकांचा त्यात सहभाग असू शकतो. त्यामुळे इंटरसेक्स असणे ही कोणाचीही चूक नसून, ही जन्मजात जैविक स्थिती आहे, अशी माहिती डॉ. रजत कपूर, प्लास्टिक सर्जरी विभाग, जे. जे. रुग्णालय यांनी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंतर्लिंगी (Intersex) म्हणजे काय?

    Ans: अंतर्लिंगी म्हणजे जन्मतःच एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक वैशिष्ट्यांमध्ये—जसे की जननेंद्रिये, गुणसूत्रे किंवा हार्मोन्स—पुरुष किंवा स्त्री या पारंपरिक वर्गीकरणापेक्षा वेगळी नैसर्गिक विविधता असणे.

  • Que: नवजात बाळाचे लिंग स्पष्ट दिसत नसल्यास त्याचे कारण काय असू शकते?

    Ans: काही बाळांमध्ये जन्मतः जननेंद्रियांची रचना नेहमीच्या पुरुष किंवा स्त्री वैशिष्ट्यांपेक्षा वेगळी असू शकते.

  • Que: अंतर्लिंगी बाळ पूर्णपणे निरोगी असू शकते का?

    Ans: होय. अंतर्लिंगी असणे आणि आजारी असणे हे एकच नाही. अनेक अंतर्लिंगी व्यक्ती निरोगी असतात.

Web Title: 68 intersex newborns born in hospitals within the mumbai municipal area over eight years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Hospital
  • new born
  • newborn baby

संबंधित बातम्या

Breastfeeding: C Section नंतर स्तनपान, सुरुवात सोपी होण्यासाठी सोप्या टिप्स
1

Breastfeeding: C Section नंतर स्तनपान, सुरुवात सोपी होण्यासाठी सोप्या टिप्स

केम्प्स कॉर्नर येथे वॉकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलतर्फे सुपरस्पेशालिटी ओपीडी सुरू
2

केम्प्स कॉर्नर येथे वॉकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलतर्फे सुपरस्पेशालिटी ओपीडी सुरू

दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर
3

दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर

Tejaswini Lonari: लेकाच्या आगमनानंतर तेजस्विनी लोणारीची पहिली पोस्ट चर्चेत; समाधानसोबतच्या खास आठवणी शेअर करत म्हणाली…
4

Tejaswini Lonari: लेकाच्या आगमनानंतर तेजस्विनी लोणारीची पहिली पोस्ट चर्चेत; समाधानसोबतच्या खास आठवणी शेअर करत म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.