
पनीरप्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
घरातील प्रत्येक व्यक्तीला पनीर खायला खूप जास्त आवडते. पनीरचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीरपासून पनीर भुर्जी, पालक पनीर, पनीर टिक्का, मसाला पनीर, पनीर कोफ्ता इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही लसूण पनीर बनवू शकता. हा पदार्थ चवीसोबत शरीरासाठी सुद्धा खूप जास्त पौष्टिक आणि गुणकारी आहे. चमचमीत, ढाबा किंवा हॉटेल स्टाईल पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही लसूण पनीर बनवू शकता. हा पदार्थ कमी साहित्यात तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. लहान मुलं लसूण खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात, अशावेळी मुलांना पनीरपासून बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावेत. चला तर जाणून घेऊया लसूण पनीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट