पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विलियम्स नॉर्मल नसणार, स्नायू आणि हाडे कमकुवत; शरीरात मोठे बदलावं हाऊ शकतात. (फोटो सौजन्य - आयस्टॉक)
भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळ यात्रा करून ९ महिने १४ दिवसानंतर पृथ्वीवर परत आले. त्यांच्यासोबत क्रू-९ चे आणखी दोन अंतराळवीर आहेत, अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान १९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. सुनीता विलियम्स आन त्यांचे दोन सहकारी गेले होते ८ दिवसाच्या मिशनने मात्र तांत्रिक बिगाड आल्याने ९ महिने लागले पृथ्वीवर परत यायला. १८ मार्चला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) सोडले होते. जेव्हा अंतराळयान पृथ्वीवर प्रवेश केला तेव्हा तापमान १६५० अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते. या काळात सुमारे ७ मिनिटे संपर्क तुटला, म्हणजेच म्हणजेच अंतराळयानाशी कोणताही संपर्क झाला नाही.
उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कोकणातील ‘कोळाचे पोहे’, नोट करून घ्या रेसिपी
बराच काळानंतर अंतराळातून परत येणं हे एक खूप मोठं आवाहन असू शकत. कारण गुरुत्वाकर्षणा शिवाय बराच काळ राहिल्यानंतर शरीरात बऱ्याच बदल होऊ शकतात आणि आपल्या शरीराला पुन्हा एकदा पृथ्वीवर नॉर्मल व्हायला आठवडे किंवा महिन्यांचा वेळ लागू शकतो. एस्ट्रोनॉट्सला पृथ्वीवर आल्या नंतर थकवा, चालायला त्रास आणि अशक्तपणा जाणवू शकतो. एस्ट्रोनॉट्सला पृथ्वीवर आल्यानंतर नासा त्यांना प्रशिक्षण आणि वैधकीय सहायता पुरवतो जेणेकरून ते लवकरात लवकर सामान्य स्थितीत परततील.
अंतराळात शरीराला वजन सहन कारण्याची गरज नाही आहे. जेणेकरून स्नायू आणि हाडे कमकुवत होतात. विशेषतः पाय, मान आणि पाठीचे स्नायू कमकुवत होऊ शकते. परतल्यानंतर, अंतराळवीरांना उभे राहण्यास, चालण्यास आणि संतुलन राखण्यास अनेकदा अडचण येऊ शकते. पृथ्वीवर आल्यानंतर, एस्ट्रोनॉटसला शारीरिक उपचार घ्यावे लागतात.
अंतराळातून परतल्यांनंतर एस्ट्रोनॉटला चक्कर, वर्टिगो आणि मोशन सिकनेस होऊ शकते. शिवाय एस्ट्रोनॉटला असं वाटतं जग फिरत आहे, जेव्हा ते त्यांचे डोके हलवतात तेव्हा त्यांच्या मेंदूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.
काही एस्ट्रोनॉट्सला स्पेसफ्लाइट-एसोसिएटेड न्यूरो-ऑक्यूलर सिंड्रोम होऊ शकतात. ज्यामुळे धूसर दृष्टी होऊ शकते. आजू – बाजूच्या वस्तूंमध्ये फोकस करायला देखील त्रास होऊ शकतो. अंतराळातून आल्यानंतर एस्ट्रोनॉट्सला बऱ्याच वेळ भावनिक आव्हानांनाही तोंड द्यावे लागू शकते. अंतराळात काही महिने काढल्यानंतर पृथ्वीची रोशनी, आवाज, गंध आणि लोकांच्या गर्दीत त्यांना अस्वस्थ वाटू शकते. एवढाच नाही तर त्यांच्या झोपेवर देखील परिणाम होऊ शकते.
नासाच्या अंतराळवीरांच्या समस्या आणि त्रासाला मात देण्यासाठी नासा विशेष प्रशिक्षण आणि पुनर्वसन कार्यक्रम चालवतो. या प्रोग्रॅम मध्ये वैधकीय, शारीरिक मानसिक दृष्ट्या मजबूत बनवण्याकरिता प्रशिक्षण आणि मदत दिले जाते.
पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स राहणार क्वारंटाइन! शरीरात वाढू शकतो ‘या’ भयानक आजारांचा धोका