Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

पावसाळ्यात आल्याचे दर वाढल्याने त्याची खरेदी महाग पडू शकते. मात्र थोडीशी काळजी घेतली तर तुम्ही घरच्या कुंडीतच सहज आले उगवू शकता आणि गरजेनुसार ताजे आले वापरू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 02, 2026 | 08:15 PM
Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

Gardening Tips : आल्याचे दर गगनाला भिडले? घरातल्या कुंडीतच अशा प्रकारे वाढवा आले; ही सोपी पद्धत येईल कामी

Follow Us
Follow Us:
  • आल्याची लागवड करण्यासाठी योग्य निवड करणे महत्त्वाचे आहे.
  • कुंडी आणि मातीची निवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
  • रोपाची योग्य काळजी घेतल्यास काही महिन्यांत मिळू शकतो अपेक्षित फायदा.
स्वयंपाकघरात अधिकतर वापरल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक म्हणजे अदरक. चहात असो वा भाजीत पदार्थांची चव वाढवण्यासाठी अदरकचा मोठा वापर होत असतो. सर्दी-खोकल्यावर उपाय म्हणूनही घरच्या घरी अदरकचे चाटण तयार करुन खाल्ले जाते. पावसाळ्यात मात्र अदरकचे दर फार वाढतात. वाढत्या किमतीमुळे तुम्हीही चिंतेत असाल तर यावर एक कायमचा उपाय म्हणजे अदरकला घरीच उगवणे. होय, बाकी भाज्यांप्रमाणेच तुम्ही घरीच अदरकची देखील लागवड करु शकता. हा तुमच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरेल जो तुुमच्या फायद्याचाही असेल. लहान-सहान गोष्टींमध्ये वापरला जाणारा हा अदरक विकत घेण्याची गरज नाही. विचार करा तुम्हाला वाटेल तितका आणि वाटेल तेव्हा तोडून तुम्ही या अदरकचा मोफत वापर करु शकता. गार्डनिंग लव्हर्ससाठी तर ही एक चांगली संधी आहे. कुड्यांमध्ये फक्त फुलच कशाला, रोजच्या आहारातील काही भाज्या देखील उगवता येऊ शकता. घरी उगवलेल्या या भाज्यांमध्ये भेसळ नसेल ज्यामुळे आरोग्यासाठीही याचा फायदा होईल. थोडीशी काळजी घेतल्यास अदरकचे झाड घरी सहज उगवता येऊ शकते.

कुंडीत अदरक कसे उगवावे?

अदरकचे झाड लावण्यासाठी सर्वप्रथम एक निरोगी आणि ताजे मूळ निवडा. मूळ खूप मऊ, कोरडे किंवा बुरशीयुक्त नसावे. त्याला लहान कोंब आलेले असतील तर उत्तम कारण यातूनच पुढे नवीन कोंब येतात. याशिवाय तुम्हाला या झाडासाठी एक मोठ्या कुंडीची निवड करावी लागले. पसरट, मोठ्या आकाराच्या कुंडीत झाडाची योग्य वाढ होईल. आल्याची मुळे जमिनीखाली पसरतात, त्यामुळे खूप खोल कुंडीपेक्षा रुंद कुंडी अधिक योग्य ठरते. कुंडीच्या खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी काही छिद्रे करायला विसरु नका.

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

या गोष्टी लक्षात ठेवा

अदरकच्या काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. एक म्हणजे मातीतील ओलावा, माती ओलसर राहिली पाहिजे पण त्यातून पाण्याचा निचरा होणेही आवश्यक आहे. पाणी मातीत साचून राहता कामा नये. जास्त पाण्यामुळे मातीतील मुळे सडू शकतात आणि तुमची सर्व मेहनत वाया जाईल.

आल्याचे कंद कसे तयार करावे?

निवडलेल्या आल्याला लहान तुकड्यांमध्ये कापता येते. लक्षात ठेवा की, निवडलेल्या तुकड्यावर एक किंवा दोन निरोगी कोंब आल्याची खात्री करा. या कोबांमधूनच नवीन आले उगवण्यास मदत होईल. लागवड करण्यापूर्वी कंदाचे तुकडे काही तास पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर माती तयार करा. सामान्य मातीत थोडे सेंद्रिय खत आणि कोकोपीट मिसळल्याने माती भुसभुशीत होते. यामुळे मुळांना आणि कंदांना पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळते.

कुंडीत आले उगवण्याची योग्य पद्धत

कुंडीत तयार माती भरल्यानंतर आल्याचे तुकडे २ ते ५ सेंटीमीटर खोल पुरा. कोंब असलेला भाग वरच्या बाजूला ठेवा आणि त्यावर थोडीशी माती घाला. यानंतर मातीत थोडं पाणी घाला. इथे अनेकदा लोक एक चूकी करतात की, लागवड केल्यानंतर मातीत भरपूर पाणी घालतात. लक्षात घ्या, जास्त पाणी घालणे देखील झाडासाठी चांगले नसते. माती कोरडी वाटत असल्यास वरुन हलकं पाणी घाला. पावसाळ्यात जर वातावरण दमट असेल तर पाण्याची कमी गरज भासू शकते.

रोपाची काळजी कशी घ्यावी?

कुंडीला नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल. वेळोवेळी खत टाकायला विसरु नका. यासाठी तुम्ही सेंद्रिय खत किंवा गांडूळ खताचा वापर करु शकता. हे लक्षात घ्या की, वरुन दिसणारे रोप हे झाडाची खरी वाढ दाखवत नाहीत. खरे मूळ हे मातीच्या आत येत असते. त्यामुळे सुरुवातीलाच जर रोप लहान दिसत असेल तर काळजी करु नका.

गणपती उत्सवात पारंपरिक पद्धतीने बनवा नैवेद्याच्या पानातील तोंडली भात, पदार्थ पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

आले कधी काढावे?

आल्याची वाढ होण्यासाठी साधारण काही महिन्यांचा अवधी लागतो. जेव्हा रोपांची पाने हळूहळू पिवळी होऊ लागतात आणि नवीन वाढ कमी होऊ लागते, तेव्हा मातीच्या आत मुळे तयार होत येण्याची वेळ जवळ आलेली असते. गरजेनुसार, हवे तितके आले आपण काढू शकतो. आले कुंडीत लावणे म्हणजे फक्त पैसे वाचवणे नाही तर घरातच आपली बाग तयार करण्याची एक सुरुवात आहे.

 

Web Title: How to grow ginger at home in a pot easy ginger gardening tips and methods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • dry ginger water
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष
1

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
2

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील
3

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास
4

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.