Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पायांना सूज अन् त्वचेला खाज’ ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

किडनी शरीरातील अतिरिक्त द्रव आणि अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करते. मात्र किडनीच्या कार्यात बिघाड होऊ लागल्यास शरीर काही संकेत देऊ लागते. ही लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 01, 2026 | 08:15 PM
'पायांना सूज अन् त्वचेला खाज' ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

'पायांना सूज अन् त्वचेला खाज' ही असू शकते Kidney Disease ची लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:
  • शरीरात दिसणाऱ्या काही बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
  • लघवीशी संबंधित बदलांकडे विशेष लक्ष द्या.
  • लक्षणे सतत जाणवत असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
शरीराला निरोगी आणि डिटाॅक्स करण्याचे काम किडनी करत असते. शरीरातील सर्व घाण बाहेर फेकून काढण्यासाठी किडनीची फार मोठी मदत होत असते. अशात जर आपली किडनी खराब होत असेल तर आपल्या शरीरासाठी ती वाईट गोष्ट ठरु शकते. किडनी खराब होऊ लागली की शरीराच्या वेगवेगळ्या भागांत याचे काही संकेत दिसू लागतात. सुरुवातीला काही किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्षित केले जाणारे आजार खरंतर किडनी खराब होण्याचे संकेत असतात. अनेकजण शरीरातील सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करु लागतात ज्यामुळे पुढे जाऊन किडनी फेलरच्या रोगाचा त्यांना सामना करावा लागतो. आज आपण या लेखात अशा काही लक्षणांविषयी जाणून घेणार आहोत जे किडनी खराब होत असल्याचे संकेत देतात. या लक्षणांना वेळीच ओळखल्यास आजार मोठा होण्याआधीच तुम्ही यावर योग्य ते उपचार घेऊ शकता आणि स्वत:ला सुरक्षित बनवू शकता.

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

पायांमध्ये सूज येणे

कोणतीही दुखापत न होता जर तुम्हाला पायांमध्ये सतत वेदना जाणवत असतील, पायांना सूज येत असेल तर हे किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. किडनी जेव्हा खराब होऊ लागते, तेव्हा ती शरीरात योग्यरित्या कार्य करत नाही. यामुळे शरीरातून अतिरिक्त सोडियम आणि पानी बाहेर पडत नाही ज्यामुळे हे द्रव पदार्थ पायांच्या खालच्या भागात जमा होऊ लागतात. यामुळेच पायांना सूज येऊ लागते.

त्वचेवर खाज येणे

त्वचेवर सतत खाज सुटणे फक्त एलर्जी किंवा कोणत्या इंफेक्शनचे लक्षण नसून यामागे किडनीचा आजारही दडलेला असू शकतो. शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. अशात जर किडनी खराब होऊ लागली तर टॉक्सिन्स शरीरातच साठू लागतात. रक्तात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढू लागले की त्वचेवर खाज सुटू लागते. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि यावर पुरळ येऊ लागतात.

लघवीमध्ये बदल

अचानक सारखे लघवीला येणे, लघवीतून फेस किंवा रक्त येणे. हे लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे आणि शरीरात विषारी द्रव्ये साचल्यामुळे होते. किडनीच्या आजारात बऱ्याचदा डोळ्यांखाली सूज देखील येऊ लागते.

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

डाॅक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?

जर तुम्हाला आपल्या शरीरात ही लक्षणे आठवडाभरापासून सतत दिसून येत असतील तर कोणताही वेळ वाया न घालवता तुम्ही लगेच यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तुम्ही KFT (Kidney Function Test), युरिन टेस्ट आणि ब्लड प्रेशर तपासणी करु शकता. किडनीच्या आजारापासून जर स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर आजपासून आपल्या आहारात मीठाचे प्रमाण कमी करा, जास्तीत जास्त पाणी प्या आणि लक्षणे आढळल्यास रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.

Web Title: Kidney disease warning signs you should not ignore and when to consult a doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • kidney damage
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी
1

Mumbai News: मुंबईत ऑर्थोपेडिक सेवांचा विस्तार; निवम ऑर्थोपेडिक्सची सूर्या हॉस्पिटल्ससोबत भागीदारी

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
2

Health Tips: फक्त चवीसाठीच नाही! वजन कमी करण्यापासून पचन सुधारण्यापर्यंत, वेलचीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत
3

गोकर्णाच्या फुलांपासून कसा तयार करायचा फेस सिरम? सुरकुत्यांपासून चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर, फाॅलो करा ही सोपी पद्धत

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश
4

Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.