Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा ‘या’ गोष्टी, मिळेल आराम

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि थकवा कमी करण्यासाठी आहाराची भूमिका महत्त्वाची असते. शरीरातील लोह आणि मॅग्नेशियमची कमतरता टाळण्यासाठी योग्य पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 04, 2026 | 08:15 PM
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा 'या' गोष्टी, मिळेल आराम

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढतोय मासिक पाळीचा त्रास; डाएटमध्ये समाविष्ट करा 'या' गोष्टी, मिळेल आराम

Follow Us
Follow Us:
  • मासिक पाळीदरम्यान शरीरातील एका महत्त्वाच्या पोषक घटकाची कमतरता जाणवू शकते.
  • स्नायू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक असलेल्या घटकाचा मासिक पाळीतील वेदनांशी संबंध असू शकतो.
  • या काळात आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते.
मासिक पाळी ही महिलांच्या शरीरात दर महिन्याला होणारी एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. या काळात साधारणपणे ३ ते ७ दिवस योनीमार्गातून रक्तस्राव होतो. महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटात वेदना, थकवा, मूड स्वींग्स अशा समस्यांचा सामना करावा लागतो. सतत वाढणऱ्या समस्यांमध्येही महिला आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत नाही. तज्ञ सांगतात की, आपल्या आहाराचा मासिक पाळीवर परिणाम होत असतो. शरीरात जर लोह आणि मॅग्नेशियमची कमतरता जास्त असेल तर याचा मासिक पाळीच्या वेदनांवर परिणाम होत असतो.

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

लोहाची कमतरता

शरीरात जर लोहाचे प्रमाण कमी असेल तर त्यामुळे शरीरातून जास्त रक्तस्त्राव होतो. लोह आणि पिरियड ब्लिडिंगचे थेट संबंध आहे. दर महिन्याला होणाऱ्या ब्लीडिंगमुळे शरीरात लोहचे प्रमाण कमी होते. शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाल्याने थकवा, अशक्तपणा, एकाग्रतेचा अभाव आणि मनःस्थितीत बदल होऊ शकतो.

कोणत्या गोष्टींचा डाएटमध्ये समावेश करायला हवा?

डाॅक्टरांच्या मते, मासिक पाळीदरम्यान आहारात पालक, डाळी आणि राजमाचा समावेश करायला हवा. मांसाहारप्रेमी आपल्या आहारात लाल मांसाचा समावेश करु शकतात. यासोबतच शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्तांचे सेवन केले जाऊ शकते. यात लिंबू, टोमॅटो आणि संत्र्यांचा समावेश होतो.

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

मॅग्नेशियमची कमतरता

शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण स्नायू शिथिल करण्यात आणि मज्जासंस्थेचा समतोल राखण्यात मोठी मदत करत असतात. ज्या महिलांच्या शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आढळते त्यांना मासिक पाळीदरम्यान भरपूर त्रास होतो याला डिसमेनोरिया असे म्हटले जाते. मॅग्नेशियमयुक्त आहाराचे सेवन केल्याने वेदनांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. यामुळे पेनकिलर घेण्याचीही गरज तुम्हाला भासणार नाही. शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया, बदाम, केळी आणि ७० टक्के किंवा त्याहून अधिक कोको असलेले डार्क चॉकलेट याचे सेवन करु शकता. याशिवाय तुम्ही मासिक पाळीदरम्यान अक्रोड आणि जवस सारख्या पदार्थांचाही समावेश करु शकता. याचे सेवन वेदना कमी करण्यास आणि मानसिक आराम मिळवून देण्यास मदत करते.

 

Web Title: Foods to eat during period for iron magnesium deficiency and period pain relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Periods

संबंधित बातम्या

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!
1

Krishna Life Lessons for Gen Z: Gen-Z ने कृष्णाकडून शिकावं काय? आयुष्य बदलून टाकतील ‘हे’ 7 जीवनधडे!

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!
2

Oil Kettle Cleaning Tips: तेलाची किटली चिकट झालीये? फक्त 5 मिनिटांत करा चकाचक, सणाआधी नक्की करून पाहा!

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा
3

Fertilizer Hibuscus Tips: जास्वंदीला येतील भरभरून फुले! बाप्पाच्या आगमनाआधी फक्त हा एक उपाय करून पाहा

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू
4

२५ कोटींचे डीएसए यंत्र पुन्हा वापरात; ट्रॉमा रुग्णालयात बंद ‘न्युरोइंटरव्हेन्शन’ सेवा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.