Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skin Care Tips: झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा ‘ही’ एक गोष्ट, त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार

Benefits Of Applying Almond Oil On Face: जर तुम्हालाही तरुण आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ही एक गोष्ट लावा. जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 01, 2026 | 07:24 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • चेहऱ्यावर लावा ही एक गोष्ट
  • त्वचा दिसेल तरुण अन् तजेलदार
  • बदामाच्या तेलाचे त्वचेसाठी फायदे
आजकाल बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, अपुरी झोप आणि सततचा ताण याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. या कारणांमुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि थकलेली दिसू लागते तसेच कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. त्यामुळे अनेकजण महागड्या स्किन केअर उत्पादनांचा वापर करतात. मात्र, घरगुती उपायांमध्ये बदामाचे तेल हा एक प्रभावी आणि नैसर्गिक पर्याय मानला जातो. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेल लावल्यास त्वचेला अनेक फायदे होतात.

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक त्वचेला पोषण देण्यास मदत करतात. विशेष म्हणजे, रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर बदाम तेल लावल्यास त्वचेला रात्रभर रिपेअर होण्यास मदत मिळते. त्यामुळे सकाळी त्वचा अधिक मऊ, तजेलदार आणि फ्रेश दिसू शकते. अनेक ब्युटी एक्स्पर्ट्सदेखील नियमित स्किन केअरमध्ये बदाम तेलाचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

Health Tips: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने खरंच वजन वाढतं? जाणून घ्या यामागचे सत्य

त्वचेला मॉइश्चराइज्ड होते

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा मऊ, चमकदार आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. विशेषतः कोरड्या त्वचेसाठी हे तेल फायदेशीर मानले जाते.

सुरकुत्या आणि एजिंग कमी करण्यास मदत

बदाम तेलातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेवरील फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी करतात. त्यामुळे फाइन लाईन्स आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. तेलाच्या नियमित आणि योग्य वापरामुळे त्वचा अधिक तरुण दिसू शकते.

डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत

डोळ्यांखाली हलक्या हाताने बदाम तेलने मसाज केल्यास डार्क सर्कल्स आणि सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे चेहरा अधिक फ्रेश दिसतो. नियमित आणि योग्य पद्धतीने बदाम तेलाचा वापर केल्यास त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि चमकदार दिसू शकते.

त्वचेची जळजळ आणि कोरडेपणा कमी

बदाम तेलात अँटीफंगल गुणधर्म असल्याने त्वचेची खाज, जळजळ आणि ड्रायनेस कमी होऊ शकतो. संवेदनशील त्वचेसाठीही हे उपयुक्त मानले जाते.

बदाम तेल वापरण्याची योग्य पद्धत

रात्री चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
२ ते ३ थेंब बदाम तेल हातावर घ्या.
हलक्या हाताने चेहरा आणि मानेला मसाज करा.
रात्रभर तसेच ठेवून सकाळी चेहरा धुवा.

 ही काळजी घ्या

तज्ज्ञांच्या मते, कोणतेही नवीन तेल किंवा उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे. तसेच बाजारातील काही बदामाच्या तेलामध्ये मिनरल ऑइलचे प्रमाण जास्त असू शकते. त्यामुळे शुद्ध आणि विश्वसनीय उत्पादन निवडणे महत्त्वाचे आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Papaya Health Facts: कच्ची पपई खाणे फायदेशीर की हानिकारक? आरोग्यावर काय परिणाम होतो?

Web Title: Almond oil benefits for face overnight glowing skin natural skincare marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Benefits of almonds
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप
1

मेकअप रिमूव्हर संपले आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून काही मिनिटांमध्ये काढा वॉटरप्रूफ मेकअप

आठवडाभरात चेहऱ्यावरील पिगमेंटशन होतील कायमचे गायब! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ नॅचरल ड्रिंकचे सेवन
2

आठवडाभरात चेहऱ्यावरील पिगमेंटशन होतील कायमचे गायब! रात्री झोपण्याआधी नियमित करा ‘या’ नॅचरल ड्रिंकचे सेवन

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब
3

चेहऱ्यावरील तेज कमी झाला आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा नॅचरल टोनर, सुरकुत्या होतील गायब

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे
4

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.