
Glass Skin: काचेसारखी पांढरी शुभ्र चकचकीत त्वचा मिळवण्यासाठी 'हे' उपाय ठरतील अतिशय प्रभावी, चारचौघात दिसेल सुंदर त्वचा
Glass Skin: त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी सर्वच माहिला सतत काहींना काही करत असतात. महागडे स्किन केअर, क्रीम, वेगवेगळ्या ट्रीटमेंट करुन चेहऱ्यावर चमक आणली जाते. पण स्किन ट्रीटमेंट, हानिकारक केमिकलचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे चेहरा खूप जास्त कोरडा पडून जातो. बऱ्याचदा सोशल मिडियासह इतर ठिकाणी ग्लास स्किन शब्द कायमच ऐकायला मिळतो. काचेसारखी नितळ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा म्हणजे ग्लास स्किन, असाच अर्थ घेतला जातो. भारतासह संर्पूण जगभरात कोरियन स्किनकेअर रुटीनचा ट्रेंड लोकप्रिय झाला आहे. सर्वच माहिला ग्लास स्किन मिळवण्यासाठी कोरियन स्किनकेअर रुटीन फाॅलो करतात. कोणताही डाग, छिद्र किंवा त्वचेची नैसर्गिक पोत अजिबात समजून न घेता कोणत्याही प्रोडक्ट्सचा वापर त्वचेसाठी केला जातो. (फोटो सौजन्य – istock)
त्वता अधिक ग्लोईंग आणि सुंदर दिसण्यासाठी चुकीच्या स्किन केअरचा वापर करणे टाळावे. त्वचा निरोगी आणि योग्य प्रकारे मॉइश्चराइज्ड त्वचा प्रकाश परावर्तित करण्यासाठी केवळ स्किन केअरच नाहीतर आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चमकदार त्वचेचे फोटो, स्किनकेअर रुटीनचे ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता समजून न घेताच प्रोडक्ट्स आणून चेहऱ्यावर लावले जातात. मेकअपपेक्षा त्वचेची नैसर्गिक चमक आणि त्वचेचा पोत सुधारण्यावर भर देणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
ग्लास स्किन मिळवण्यासाठी सगळ्यात आधी त्वचा स्वच्छ ठेवणे फार आवश्यक आहे. त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य फेस क्लिंझरचा वापर करावा अतिशय महागड्या फेस क्लिंझरचा वापर करण्याऐवजी त्वचेला सूट होईल असेच फेस क्लिंझर वापरावे. चेहरा वारंवार किंवा खूप जोरात घासू नये. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी होऊन जातो. त्वचा अधिक कोरडी आणि संवेदनशील असल्यास पॅच टेस्ट करून पाहावी. जेणेकरून त्वचेला कोणतीही हानि पोहचणार नाही. हायड्रेटिंग मॉइश्चरायझर नियमित वापरल्यास त्वचेतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते. त्वचा तेलकट असेल तरीसुद्दा मॉइश्चरायझरचा वापर करावा. योग्य आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझरचा वापर त्वचेसाठी करावा.
चेहऱ्यावर नियमित सनस्क्रीन लावणे फार आवश्यक आहे. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान, टॅनिंग आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हे वाढू नयेत म्हणून चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन वापरणे फार आवश्यक आहे. बाहेर पडताना SPF ३० किंवा त्यापेक्षा जास्त ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरावी. यामुळे टॅनिंग कमी होते. त्वचेला अधिक नितळ दिसण्यासाठी एक्सफोलिएशन करणे फार गरजेचे आहे. मृत त्वचेच्या पेशी काढण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य केमिकल एक्सफोलिएंटचा वापर करावा. याशिवाय लिंबू, बेकिंग सोडा किंवा इतर तीव्र घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी करू शकता. ग्लास स्किनसाठी केवळ स्किनकेअर रूटीन पुरेसे नाही, तर पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, फळे-भाज्या, प्रथिने आणि आवश्यक पोषक घटकांचा आहारात समावेश करणे, पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.