मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला आज 29 मे पासून सुरुवात होणार आहे. बॉलीवूडमधील सर्व स्टार्स आणि अनेक मोठ्या व्यक्तींची या ठिकाणी हजेरी लागणार आहे. इटलीमध्ये एका ग्रँड क्रुझवर 29 मे ते 1 जून या कालावधीत ही पार्टी रंगणार आहे. हे क्रुझ इटली ते फ्रान्स असा 4380 किलोमीटरचा प्रवास करेल आणि यादरम्यान अनेक पार्ट्या, लंच-डिनर, मजा आणि मस्ती रंगणार आहे.
बुधवारपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्याची पहिली काही अमेझिंग छायाचित्रे आता समोर आली आहेत. हे फोटो या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या सर्वांच्या लाडक्या ओरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्याचे अंबानी कुटुंबीयांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका ही त्याची जवळची मैत्रीण असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य – @orry Instagram)
कोण आहे ओरी?
ओरी अर्थात ओरहान अवतरामानी नक्की कोण आहे हे अनेकांना माहीत नाही. मात्र अनेक सेलिब्रिटींसह ओरी कायम पार्टीमध्ये उपस्थित असतो आणि एका सेल्फीसाठी २५ लाख रुपये घेतो असं सांगण्यात येते. तो एक बिझनेसमॅन असून त्याचा नक्की कोणता उद्योग आहे हे मात्र अद्यापही अनेकांना माहीत नाही.
युरोप ट्रीपला निघताना ओरीला मुंबई विमानतळावर पापाराझीच्या कॅमेऱ्यांनी कैद केले. अंबानींच्या या लक्झरी क्रूझ पार्टीची सर्वत्र चर्चा होत असतानाच ओरीने क्रूझ आणि बीचचे काही फोटो शेअर केले आहेत जे पोएटो इटली, सार्डिनिया येथील आहेत. ओरीने त्याच्या खोलीची झलकही दाखवली आहे.
[read_also content=”अनंत अंबानीच्या लग्नासाठी आई नीता अंबानीच्या २ इच्छा https://www.navarashtra.com/lifestyle/mother-nita-ambanis-2-wishes-for-anant-ambanis-marriage-statement-made-for-daughter-in-law-radhika-539457/”]
बीचवरील फोटो केले शेअर
ओरीने हे सर्व फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये त्याने क्रूझमध्ये त्याच्या खोलीतून दिसणारा समुद्र टिपला आहे. पलंगावर एक पिशवी आहे, समुद्राच्या लाटांना लागून खिडक्यांजवळ खुर्च्या आहेत आणि या सर्व गोष्टींसह ओरीने एकच गोष्ट लिहिली आहे ती म्हणजे – परफेक्ट मॉर्निंग
क्रुझच्या आतील लक्झरी
याशिवाय ओरीने इटलीतील पोएटो बीचची सुंदर झलक दाखवली आहे. तसंच या क्रूझचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बरेच फटाके फुटताना दिसत आहेत. यामध्ये ही क्रुझच्या आतला प्रत्येक कोपराही दिसून येत आहे. अंबानी कुटुंबीयांची पार्टी म्हणजे नक्कीच लॅविश असणार यामध्ये कोणाचेही दुमत नसेल.
कसा असेल लुक
चार दिवस रंगणाऱ्या पार्टीमध्ये अंबानी कुटुंबीयांचा आणि इतर सहभागी झालेल्या सेलिब्रिटींचा लुक कसा असेल याकडेही आता साऱ्यांच्या नजरा आहेत. चाहते हे जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक आहेत. तर या दुसऱ्या प्री-वेडिंग बॅशमध्ये अंबानी कुटुंबीयांचा पोशाख कसा असेल आणि आता किती कोटी किमतीचे दागिने घातले जातील यावरही चर्चा रंगू लागल्या आहेत.