
तोंडात वारंवार जखमा होतात? अल्सर बरे करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
तोंडात वारंवार अल्सर येण्याची कारणे?
तोंडातील जखमा बऱ्या करण्यासाठी उपाय?
कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे तोंडात अल्सर येतात?
जीवनशैलीत होणारे बदल, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता आरोग्याचे गंभीर नुकसान करते. तोंडात येणारे फोड किंवा जखमा काहींना अतिशय साध्या वाटतात. शरीरातील अंतर्गत अवयवांचे कार्य बिघडल्यानंतर तोंडात वारंवार जखमा होतात. विटामिन बी १२, लोह आणि झिंक यांसारख्या पोषक तत्वांची कमतरता, पचनसंस्थेतील समस्या, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे तोंडाच्या समस्या वाढू लागतात. तसेच काहीवेळा अन्नपदार्थांची ॲलर्जी, चुकीच्या टूथपेस्टचा वापर किंवा दातांमध्ये वाढलेल्या इन्फेक्शनमुळे तोंडात जखमा किंवा अल्सर येतात. पण तोंडात आलेले फोड जास्त वेळ टिकून राहिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
तोंडात येणाऱ्या अल्सर किंवा जखमांकडे जास्त लक्ष दिले जात नाही. पण यामुळे आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू शकतात. वारंवार तुमच्या तोंडात जर फोड येत असतील तर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीशी संबंध असू शकतो. पोषक घटकांची कमतरता आणि पचनसंस्था बिघडणे इत्यादी कारणांमुळे तोंडात फोड येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तोंडात येणारे अल्सर आणि जखमा बऱ्या करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.अल्सरवर वेळीच उपचार न केल्यास तोंडातील बॅक्टेरिया पेशींवर हल्ला करतात, ज्यामुळे तोंडात मोठे मोठे फोड येण्याची शक्यता असते.
२० टक्के लोकांना तोंडात फोड किंवा जखमा होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता. पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. मज्जासंस्था आणि पेशींच्या निर्मितीसाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. पण याच विटामिनची कमतरता निर्माण झाल्यास तोंडातील त्वचा संवेदनशील होते आणि सतत फोड किंवा जखमा होतात. रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर तोंडातील नाजूक पडद्याला ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे गालावर, जिभेवर किंवा तोंडाच्या कोणत्याही भागात जखमा होतात. झिंकची पातळी कमी झाल्यानंतर तोंडातील जखमा लवकर बऱ्या होत नाही.
उन्हाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूमध्ये शरीरात उष्णता वाढल्यास तोंडात मोठे मोठे फोड किंवा जखमा होण्याची जास्त शक्यता असते. उष्णतेमुळे आलेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. सिलियाक डिसीज किंवा क्रोहन्स डिसीज झाल्यानंतर आतड्यांचे आरोग्य बिघडून जाते. याशिवाय आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घाण बाहेर पडून न गेल्यामुळे तोंडात मोठे मोठे फोड किंवा जखमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ असणे फार आवश्यक आहे. शरीरात वाढलेला मानसिक तणाव शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनची पातळी वाढवतो, ज्याच्या परिणामामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. यामुळे पांढऱ्या रक्तपेशी चुकून तोंडातील स्वतःच्याच पेशींवर हल्ला करतात,ज्यामुळे तोंडात मोठ्या जखमा होण्याची शक्यता असते.
तोंडात आलेल्या जखमा आणि अल्सर बरे करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. यामुळे तोंडात जमा झालेले विषाणू मारून जातात आणि तोंड स्वच्छ होते. जखम लवकरी बरी होण्यासाठी मिठाच्या पाण्याचा वापर करावा. याशिवाय तोंडात जळजळ किंवा वेदना वाढल्यास जखमा झालेल्या ठिकाणी तूप किंवा खोबरेल तेल लावावे. तसेच मध लावल्यास जखम लवकर बरी होईल. आयुर्वेदात नैसर्गिक अँटिबॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध शरीरासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय पोटात वाढलेली उष्णता आणि घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित एक ग्लासभर ताक प्यावे.
Ans: शरीरातील उष्णता वाढणे, व्हिटॅमिन बी१२, फॉलिक ॲसिड, लोह (Iron) किंवा झिंकची कमतरता.
Ans: दिवसातून काही वेळा नारळ तेल लावल्याने जळजळ कमी होते.
Ans: लिंबू, संत्री यांसारखे आंबट पदार्थ, जास्त तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ.