Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वाघ-बकरी’ चहाच्या मागची ही क्रेझी स्टोरी माहितीय का तुम्हाला? फक्त ब्रँड नाही, तर सामाजिक क्रांती आहे आहे हा ‘वाघ-बकरी’ चहा!

जंगलात एकमेकांचे हाडवैरी असलेले वाघ आणि शेळी प्रत्यक्ष आयुष्यात कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, पण १९१९ मध्ये जन्माला आलेल्या या ब्रँडने समाजसुधारणेसाठी चहाच्या कपावर या दोघांना एकत्र आणून जगातील सर्वात अनोखा 'बिझनेस लोगो' तयार केला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 24, 2026 | 11:36 PM
‘वाघ-बकरी’ चहाच्या मागची ही क्रेझी स्टोरी माहितीय का तुम्हाला? फक्त ब्रँड नाही, तर सामाजिक क्रांती आहे आहे हा ‘वाघ-बकरी’ चहा!
Follow Us
Follow Us:

आज भारतात ‘वाघ बकरी’ हे चहाच्या क्षेत्रातील अत्यंत नामांकित नाव आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की या चहाच्या नावामागे आणि लोगोमागे एक मोठा इतिहास आणि सामाजिक संदेश दडला आहे? एका सामान्य चहाच्या ब्रँडने समाज सुधारणेसाठी आणि समानतेसाठी टाकलेले हे पाऊल अतिशय स्पेशल आहे.

दक्षिण आफ्रिकेतील सुरुवात आणि गांधीजींची साथ

या ब्रँडची सुरुवात १८९२ मध्ये झाली. गुजरातचे रहिवासी नारणदास देसाई हे चहाच्या व्यवसायानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तिथे ते चहाच्या बागा सांभाळायचे. तिथेच त्यांची भेट महात्मा गांधींशी झाली. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेष आणि भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढत असताना नारणदास देसाई यांना तिथून भारतात परतावे लागले. १९१५ मध्ये ते जेव्हा भारतात आले, तेव्हा गांधीजींच्या प्रेरणेने त्यांनी अहमदाबादमध्ये चहाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आणि १९१९ मध्ये ‘वाघ बकरी चहा’चा जन्म झाला.

महात्मा गांधींनी केला भारतीयांना स्वाभिमान जागवणारा मिठाचा सत्याग्रह; जाणून घ्या 06 एप्रिल

नावामागचा आणि लोगोमागचा क्रांतिकारी विचार

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात इंग्रजांचे राज्य होते, तसेच समाजात जातीभेद आणि उच्च-नीच भाव मोठ्या प्रमाणावर होता. नारणदास देसाई यांना चहाच्या माध्यमातून समाजात एकता निर्माण करायची होती.

त्यांनी त्यांच्या चहाचे नाव ‘वाघ बकरी’ ठेवले आणि पॅकेटवर एक खास लोगो तयार केला. या लोगोमध्ये एक वाघ आणि शेळी किंवा बकरी एकाच कपमधून एकत्र चहा पिताना दाखवले गेले. वाघ हा शक्तीचे किंवा उच्च वर्गाचे किंवा जुलमी इंग्रजांचे प्रतीक होता, तर बकरी ही सामान्य जनतेचे आणि शांततेचे प्रतीक होती. एकाच कपातून दोघांना चहा पिताना दाखवून त्यांनी हा संदेश दिला की, चहाच्या टपरीवर किंवा घरात चहा पिताना सर्व लोक समान आहेत; तिथे कोणताही भेदभाव चालणार नाही.

‘बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलंय वाघाने’! भारतीय ट्रकवरच्या मजेशीर आणि भावुक शायरींचा प्रवास

आजही टिकून असलेला वारसा

स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतरच्या काळातही या अनोख्या कल्पनेने लोकांची मने जिंकली. आज हा ब्रँड जागतिक स्तरावर पोहोचला असला, तरी त्यांचा हा सामाजिक सलोख्याचा संदेश आणि तोच ऐतिहासिक लोगो आजही कायम आहे. या एका चहाच्या ब्रँडने केवळ व्यवसाय केला नाही, तर चहाच्या कपातून समता आणि बंधुभाव रुजवला, हेच वाघ बकरी चहाचे खरे यश आहे, म्हणायला हरकत नाही.

Web Title: Back story of wagh bakari chai lifestyle news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:36 PM

Topics:  

  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Pre-Workout सप्लीमेंट घेताय?  प्री-वर्कआउट सप्लीमेंटचे शरीरावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम
1

Pre-Workout सप्लीमेंट घेताय?  प्री-वर्कआउट सप्लीमेंटचे शरीरावर होणारे चांगले आणि वाईट परिणाम

Creatine Supplement: बॉडीबिल्डिंगसाठी फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे
2

Creatine Supplement: बॉडीबिल्डिंगसाठी फायदेशीर की धोकादायक? जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

Good Health: रोज १०,००० पावले का चालावीत? वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत संपूर्ण माहिती
3

Good Health: रोज १०,००० पावले का चालावीत? वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत संपूर्ण माहिती

Construction Tips: मजबूत घराचं गुपित! भिंती आणि स्लॅबला किती दिवस आणि किती पाणी मारावं?
4

Construction Tips: मजबूत घराचं गुपित! भिंती आणि स्लॅबला किती दिवस आणि किती पाणी मारावं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.