महात्मा गांधींनी केला मिठाचा सत्याग्रह केला हा भारतीय स्वातंत्र्य लढातील महत्त्वाचा टप्पा ठरला (फोटो- टीम नवराष्ट्र)
मिठाचा सत्याग्रह हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावल्यामुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत होता. याविरोधात महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी १२ मार्च १९३० रोजी साबरमती आश्रमातून दांडीपर्यंत पदयात्रा सुरू केली. सुमारे २४० मैलांचा हा प्रवास २४ दिवसांत पूर्ण झाला. ६ एप्रिल १९३० रोजी गांधीजींनी दांडी येथे समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार करून ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केले. या कृतीने संपूर्ण देशात आंदोलनाची ठिणगी पडली. हजारो लोकांनी मिठाचा कायदा मोडला आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे राहिले. या सत्याग्रहामुळे स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताच्या आंदोलनाची दखल घेतली गेली. मिठाचा सत्याग्रह हा अहिंसात्मक आंदोलनाचे प्रभावी उदाहरण ठरला. (Dinvishesh)
06 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
06 रोजी मृत्यू दिनविशेष






