रिकाम्या पोटी तूप खाल्याने शरीराला होणारे फायदे
मागील अनेक वर्षांपासून तुपाचा वापर आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जात आहे. आयुर्वेदामध्ये तुपाला विशेष महत्व आहे. तूप खाल्यामुळे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते शिवाय आरोग्य सुधारण्यास मदत होते. आजरी पडल्यानंतर वडिलधाऱ्यांकडून तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. तुपाचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. तुपामध्ये आढळून येणारे हेल्दी फँटस आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तूप उपलब्ध आहेत. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुपाचे सेवन करावे. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शिवाय आरोग्य सुधारते. तूप खाल्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. शिवाय तुम्ही कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून पिऊ शकता. यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. पोटात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
तूप खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. हिवाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये तुपाचे सेवन करावे . थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची ऊर्जा कमी होत जाते. कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी रोज सकाळी एक चमचा तूप खावे. यामुळे शरीरातील चयापचय सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते. सकाळी उठल्यानंतर तूप खाल्यामुळे दिवसभर शरीर सक्रिय राहते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक प्रोटीन शेक पितात. मात्र हे सर्व उपाय करण्याऐवजी तुम्ही रोज अर्धा किंवा एक चमचा तूप खाल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. कारण यामध्ये हेल्दी फॅटस अधिक प्रमाणात आढळून येतात,ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
महिला त्वचा सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण द्यावे. यासाठी आहारात एक चमचा तूप खावे. तूप खाल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल टिकून राहते आणि त्वचा चमकदार दिसते. विटामिन ए, डी, ई आणि के, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे त्वचा मऊ आणि निरोगी राहते. शिवाय त्वचेवर आलेल्या सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.