शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. हा चिकट रक्तप्रवाहात अनेक अडथळे आणतो. यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्टोक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी किंवा चहा बनवून पिण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेथी दाण्यांचा चहा प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा मेथी दाण्यांच्या चहाचे सेवन

मेथी दाण्यांचा चहा डिटॉक्स ड्रिंक म्हणून प्यायला जातो. हा चहा उपाशी पोटी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होते. मेथी दाण्यांमध्ये भरपूर फायबर असते.

वजन वाढलेले कमी करण्यासाठी उपाशी पोटी महागडी सप्लिमेंट्स पिण्याऐवजी मेथी दाण्यांचा चहा प्यावा. हा चहा महिनाभर नियमित प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल.

शरीरात वाढलेली वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचा चहा गुणकारी ठरेल. यामध्ये असलेले सॅपोनिन्स आणि फायबर कोलेस्टेरॉल शोषण्यास मदत करतात आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होऊन जाते.

मेथी दाण्यांच्या चहामध्ये दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यासोबतच चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी होतात.

संधिवात, सांधेदुखी आणि स्नायू कडक होणे इत्यादी गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मेथी दाण्याचे पाणी प्यावे. मेथी दाणे शरीरासाठी वरदान ठरतात.






