Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Besan-Paneer Chilla: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला; रेसिपी नोट करा

Stuffed Besan Paneer Chila Recipe: तुम्हालाही देखील रोजच्या नाश्त्यामध्ये तेच पदार्थ खाऊन कंटाळ आला असेल तर ही हेल्दी आणि टेस्टी बेसन-पनीर स्टफ्ड चिला रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 08:15 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यामध्ये टेस्ट आणि हेल्थ या दोन्हीही गोष्टी महत्वाच्या आहे. म्हणून चवदार आणि पौष्टिक पदार्थांची निवड करणे आवश्यक असते. जर तुम्ही रोजच्या नाश्त्याला पोहे, उपमा किंवा पराठा खाऊन कंटाळला असाल तर बेसन-पनीर स्टफ्ड चिल्ला नाश्त्यासाठी ठरेल एकदम बेस्ट पर्याय. बेसनातील प्रथिने आणि पनीरमधील कॅल्शियम व प्रोटीन यामुळे हा पदार्थ पोटभर तर होतोच, शिवाय शरीरालाही आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. झटपट होणाऱ्या या बेसन-पनीर स्टफ्ड चिल्याची रेसिपी नक्की ट्राय करा.

Motion Sickness: प्रवासात मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय

साहित्य

  • १ कप बेसन
  • १ कप किसलेले पनीर
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ बारीक चिरलेला टोमॅटो
  • १-२ हिरव्या मिरच्या
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • ½ चमचा हळद
  • ½ चमचा लाल तिखट
  • ½ चमचा ओवा किंवा जिरे
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • तेल किंवा तूप

चिल्ल्याचे पीठ असे तयार करा?

एका भांड्यात बेसन, हळद, तिखट, ओवा, मीठ आणि पाणी घालून गुठळ्या राहणार नाहीत असे मध्यम घट्ट पीठ तयार करा. हे मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे चिल्ला अधिक मऊ तयार होतो. एका भांड्यात किसलेले पनीर, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र मिसळा. आवडीनुसार चिमूटभर काळी मिरी किंवा चाट मसाला घालून मिश्रण अधिक चवदार बनवू शकता. गरम तव्यावर थोडे तेल लावून बेसनाचे पीठ गोल आकारात पसरवा. एक बाजू शिजल्यानंतर त्यावर पनीरचे स्टफिंग पसरवा. चिल्ला अर्धा दुमडून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. गरमागरम चिल्ला हिरवी चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

टीप

  • चिल्ल्याचे पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट ठेवू नका. मध्यम आचेवर भाजल्यास चिल्ला बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ तयार होतो. ताजा पनीर वापरल्यास चव आणखी छान लागते.
  • आवडीनुसार गाजर, ढोबळी मिरची किंवा कोबीसारख्या भाज्याही यात घालू शकता.
महागडी क्रीम नको! तांदळाच्या पाण्यापासून घरच्या घरी बनवा नाईट क्रीम; चेहरा दिसेल तजेलदार

Web Title: Besan paneer chilla recipe healthy protein rich breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • healthy food
  • healthy recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.