Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काच, स्टील, तांब की प्लास्टिक… लहान मुलांसाठी सर्वाेत्तम पाण्याची बाटली कोणती? Pediatrician ने दिली माहिती

मुलांच्या आरोग्यासाठी योग्य पाण्याची बाटली निवडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. रवि मलिक यांनी कोणत्या प्रकारची बाटली मुलांसाठी सुरक्षित आहे आणि कोणती टाळावी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2026 | 08:15 PM
काच, स्टील, तांब की प्लास्टिक... लहान मुलांसाठी सर्वाेत्तम पाण्याची बाटली कोणती? Pediatrician ने दिली माहिती

काच, स्टील, तांब की प्लास्टिक... लहान मुलांसाठी सर्वाेत्तम पाण्याची बाटली कोणती? Pediatrician ने दिली माहिती

Follow Us
Follow Us:
  • मुलांसाठी स्टीलची बाटली सर्वात सुरक्षित आणि टिकाऊ पर्याय मानला जातो.
  • काचेची बाटली केमिकलमुक्त असली तरी ती काळजीपूर्वक वापरणे आवश्यक आहे.
  • तांब्याची आणि प्लास्टिकची बाटली वापरताना विशेष खबरदारी घ्यावी, कारण चुकीच्या वापरामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, त्यांच्या मुलांनी नेहमी स्वस्थ आणि सुरक्षित आयुष्य जगावे. घर असो वा शाळा मुलांच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींवर पालकांचे लक्ष असते. टिफिनमध्ये पाैष्टिक आहार आणि आरोग्याची काळजी यात पाण्याच्या बाटलीबाबत मात्र अनेकांना गहन प्रश्न पडतो. आजकाल अनेक वेगवेगळ्या धातूंमध्ये पाण्यांच्या बाटल्या उपलब्ध असतात. अशात आरोग्यासाठी चांगली कोणती याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो. बाटलीच्या धातूवरुन ती आरोग्यासाठी चांगली आहे की नाही याची ओळख केली जाते. अशात लोकप्रिय पीडियाट्रिशियन रवि मलिक याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ बनवत याबाबत काही माहिती शेअर केली आहे. चला डाॅक्टर याबाबत काय सांगतात ते जाणून घेऊया.

केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर

डाॅक्टरांचा सल्ला

डाॅक्टरांच्या मते, लहान मुलांसाठी बाटलीची किंंमत आणि त्याचे डिजाईन पाहून बाटलीची निवड करु नये. बाटली निवडताना आरोग्यासाठी ती सुरक्षित आहे की नाही हे देखील तपासायला हवे. लहान मुलांसाठी योग्य जेवण निवडण्याइतकेच योग्य बाटली निवडणेही महत्त्वाचे ठरते.

कोणती बाॅटल आहे सर्वात सुरक्षित?

डाॅक्टर रवि मलिकच्या मते, लहान मुलांसाठी स्टीलची बाटली सर्वात उत्तम पर्याय ठरतो. स्टीलची बाटली मजबूत असते ज्यामुळे ती लवकर तुटत नाही. लहान मुलाने शाळेत खेळताना आपली बाटली आपटली किंवा त्याच्याकडून खाली पडली तरी बाटली तुटण्याचा धोका यात नसतो. बाटलीत पाणी भरताना फक्त ती योग्य प्रकारे पाण्याने आणि साबणाने स्वच्छ करावी. स्टीलच्या बाटलीत घाण लवकर जमा होत नाही. जर तुम्ही रोज शाळेत जाणाऱ्या मुलासाठी बाटली शोधत असाल तर स्टीलची बाटली तुमच्यासाठी योग्य ठरेल.

कोचेची बाटली

जर मुलगा थोडा मोठा असेल आणि आपल्या वस्तूंची नीट काळजी घ्यायला त्याला जमत असेल तर काचेची बाटली त्याच्यासाठी परफेक्ट ठरेल. काचेच्या बाटलीत कोणत्याही प्रकारचे केमिकल नसते आणि यामध्ये पाण्याची चव देखील बदलत नाही. काचेच्या बाटलीला स्वच्छ करणे देखील सोपे आहे. परंतु यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बाटलीला योग्य रितीने हाताळणे. बाटली हातातून सटकताच काच फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे याला काळजीपूर्वक हाताळावे.

तांब्याची बाटली

आजकाल अनेकजण तांब्याची बाटली वापरतात. पूर्वीच्या काळापासून तांब्याचा वापर केला जात आहे. परंतु मुलांसाठी याचा योग्य रितीने वापर करणे फार महत्त्वाचे ठरते. डाॅक्टरांच्या मते, तांब्याच्या बाटलीत जर खूप गरम पाणी ठेवले किंवा यात लिंबू सरबत अथवा कोणते फ्रुट ज्यूस ठेवले गेले तर त्यात तांब्याचे काही कण मिसळले जाऊ शकतात. यामुळे पोटदुखी, उलट्या आणि अन्य समस्यांना खुले आमंत्रण मिळते.

वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या

प्लॅस्टिक बाॅटल

प्लॅस्टिक बाटली हलकी असते. परंतु लहान मुलांना सहसा ही बाॅटल वापरण्यास न देण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. जर प्लॅस्टिकची बाॅटल तीव्र उष्णात किंवा गरम जागी ठेवली तर त्यातील BPA सारखे केमिकल पाण्यात मिसळून जातात. असे केमिकल शरीरातील हार्मोन्सवर वाईट परिणाम करु शकतात. यामुळे पुढे जाऊन लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.

Web Title: Best water bottle for kids steel vs plastic glass copper bottle doctor advice marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Child Health
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
1

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे
2

Beauty Tips : चेहऱ्यावर केळीची साल घासल्याने काय होते? अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने सांगितले फायदे

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?
3

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा
4

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.