Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gums Health: ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतंय? जाणून घ्या त्यामागची गंभीर कारणे

Bleeding Gums Causes: दात घासताना किंवा फ्लॉस वापरताना हिरड्यांतून रक्त येणे ही केवळ सामान्य समस्या नाही. वारंवार हिरड्यांतून रक्त का येते, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 03, 2026 | 06:31 PM
Gums Health: ब्रश करताना हिरड्यांतून रक्त येतंय? जाणून घ्या त्यामागची गंभीर कारणे
Follow Us
Follow Us:
  • हिरड्यांतून रक्त येतंय?
  • रक्त येण्याची प्रमुख कारणे
  • कोणत्या व्यक्तींनी घ्यावी अधिक काळजी
दात घासताना किंवा फ्लॉस वापरताना हिरड्यांतून रक्त येणे ही समस्या अनेकांना जाणवते. अनेकजण याकडे किरकोळ त्रास दुर्लक्ष करतात. मात्र डेंटिस्टच्या मते इन्फ्लेमेशन किंवा इतर आरोग्यविषयक समस्येमुळे हिरड्यांमध्ये वारंवार रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे सतत रक्तस्राव होत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता वेळेवर डेंटिस्टकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

Heart Health: फिट हार्ट, हेल्दी लाइफ! रोजच्या जीवनातील ‘या’ सवयी हृदयासाठी ठरतील वरदान

हिरड्यांतून रक्त येण्याची प्रमुख कारणे

हिरड्यांवर प्लाक आणि जंतूंचा थर साचल्यामुळे ‘जिंजिव्हायटिस’ होऊ शकतो. जिंजिव्हायटिसमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होऊ शकतो. याशिवाय खूप जोरात ब्रश करणे, कठीण ब्रिसल्सचा ब्रश वापरणे, फ्लॉसची चुकीची पद्धत, धूम्रपान, व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन केची कमतरता तसेच काही औषधांच्या परिणामामुळेही हिरड्यांतून रक्त येऊ शकते. गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदलही काही महिलांमध्ये ही समस्या वाढवू शकतात.

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

रक्तस्रावासोबत हिरड्यांची सूज, लालसरपणा, तोंडाला सतत दुर्गंधी येणे, दात हलल्यासारखे वाटणे किंवा हिरड्यांमधून पू येणे अशी लक्षणे दिसत असतील, तर ती हिरड्यांच्या गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. तसेच नियमित स्वच्छता करूनही दोन आठवड्यांहून अधिक काळ रक्तस्राव सुरू राहिल्यास तपासणी करणे आवश्यक आहे.

कोणत्या व्यक्तींनी घ्यावी अधिक काळजी

मधुमेही रुग्ण, गर्भवती महिला, धूम्रपान करणारे, रक्त पातळ करणारी औषधे घेणारे तसेच आधीपासून हिरड्यांच्या आजाराचा त्रास असलेल्यांनी हिरड्यांतून होणाऱ्या रक्तस्रावाकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. अशा व्यक्तींमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असू शकतो. जर रक्तस्राव वारंवार होत असेल, वेदना वाढत असतील किंवा इतर दीर्घकालीन आजार असतील, तर विलंब न करता डेंटिस्टची भेट घ्यावी.

हिरड्यांचे आरोग्य कसे जपावे?

दिवसातून दोन वेळा फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने दात घासणे, मऊ ब्रिसल्सचा ब्रश वापरणे, नियमित फ्लॉस करणे, संतुलित आहार घेणे आणि दर सहा ते बारा महिन्यांनी दात तपासणी करून घेणे यामुळे हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Paneer Corn Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवा? मग ट्राय करा पनीर- कॉर्न सँडविच, वाचा सोपी रेसिपी

Web Title: Bleeding gums causes symptoms treatment dental health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • teeth problems
  • teeth tips

संबंधित बातम्या

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
1

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Teeth Care Tips: ब्रश करून सुद्धा दात पिवळेच दिसतात? मग लिंबाच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दातांवर येईल मोत्यासारखी चमक
2

Teeth Care Tips: ब्रश करून सुद्धा दात पिवळेच दिसतात? मग लिंबाच्या रसात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, दातांवर येईल मोत्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.