Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blood Donation: रक्तदान करण्यासाठी तुम्ही फिट आहात का? जाणून घ्या आरोग्याचे महत्त्वाचे नियम

Blood Donation Rules and Regulations: रक्तदान करण्यापूर्वी काही आरोग्यविषयक निकष पूर्ण करणे आवश्यक असून, प्रत्येक व्यक्ती रक्तदानासाठी पात्र असेलच असे नाही. म्हणून रक्तदान करण्यासाटी तुम्ही पात्र आहात का, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 14, 2026 | 06:29 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • रक्तदान करण्यासाठी तुम्ही फिट आहात का?
  • जाणून घ्या आरोग्याचे महत्त्वाचे नियम
  • रक्तदानासाठी आवश्यक पात्रता
दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन ( World Blood Donor Day) साजरा केला जातो. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, कर्करोगग्रस्त व्यक्ती तसेच रक्तविकारांनी त्रस्त असलेल्या हजारो रुग्णांसाठी रक्तदान जीवनदायी ठरते. एका युनिट रक्तातून विविध घटक वेगळे करून अनेक रुग्णांना मदत करता येते. त्यामुळे रक्तदानाला ‘महादान’ म्हटले जाते. मात्र रक्तदान करण्याची इच्छा असली तरी प्रत्येक व्यक्ती रक्तदानासाठी पात्र असेलच असे नाही. रक्तदाता आणि रक्त स्वीकारणाऱ्या रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी काही आवश्यक आरोग्यविषयक निकष पूर्ण करणे गरजेचे असते. म्हणून रक्तदान करण्यासाठी तुम्ही पात्र आहात का, जाणून घ्या.

Sleeping Tips: रात्री झोप येत नाही? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, मिळेल गाढ अन् शांत झोप

रक्तदानासाठी आवश्यक पात्रता

रक्तदान करणारी व्यक्ती साधारणतः १८ ते ६५ वर्षे वयोगटातील असावी. तिचे वजन किमान ४५ ते ५० किलो असणे आवश्यक मानले जाते. तसेच शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. रक्तदाता व्यक्ती निरोगी असावी आणि रक्तदानाच्या वेळी कोणताही संसर्ग, ताप किंवा गंभीर आजार नसावा.

दीर्घकालीन आजार

दीर्घकालीन आजार असल्यास रक्तदान करता येत नाही, असा लोकांचा अनेकदा गैरसमज असतो, पण ते खरे नाही. जर तुमचा रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात असतील, तर इतर सर्व आरोग्यविषयक निकष पूर्ण केल्यास तुम्ही रक्तदान करू शकता.

कोणत्या परिस्थितीत रक्तदान टाळावे?

ताप, सर्दी, खोकला किंवा इतर संसर्गजन्य आजार असल्यास रक्तदान करू नये. गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनीही रक्तदान टाळावे. एचआयव्ही, हिपॅटायटिस, काही रक्तविकार, गंभीर हृदयविकार किंवा विशिष्ट वैद्यकीय उपचार सुरू असलेल्या व्यक्तींना रक्तदान करण्यास मनाई असू शकते. काही औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

रक्तदानापूर्वी घ्या ही काळजी

रक्तदानाच्या २ ते ३ तास आधी पौष्टिक आहार घ्यावा. रिकाम्या पोटी रक्तदान करू नये. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून पुरेसे पाणी, फळांचा रस किंवा इतर द्रवपदार्थ घ्यावेत. रक्तदानानंतर काही काळ विश्रांती घेणे आणि आयरन व व्हिटॅमिन सीयुक्त आहार घेणे फायदेशीर ठरते.

रक्तदान का महत्त्वाचे?

तज्ज्ञांच्या मते, एका युनिट रक्तामुळे तीन रुग्णांपर्यंत मदत पोहोचू शकते. रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नसल्याने स्वेच्छेने केलेले रक्तदान हेच रुग्णांसाठी सर्वात मोठे जीवनदान ठरते. त्यामुळे आपण पात्र असल्यास नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडू शकतो.

वैद्यकीय उपचारानंतर रक्तदान कधी करावे?

जर तुम्ही आजारी असाल, तर पूर्णपणे बरे झाल्यानंतरच तुम्ही रक्त दान करू शकता. तसेच, जर तुमची अलीकडेच शस्त्रक्रिया झाली असेल, दातांचे उपचार झाले असतील, लस घेतली असेल किंवा रक्त संक्रमण झाले असेल, तर तुम्हाला पुन्हा रक्त दान करण्यापूर्वी काही काळ थांबावे लागू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kitchen Tips: कांदा कापताना डोळ्यांत पाणी येते? ‘या’ घरगुती उपायांनी होईल समस्या दूर

Web Title: Blood donation eligibility health requirements world blood donor day guidelines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • daily health tips
  • Health Care Tips
  • world blood donor day

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी
3

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.