आतड्याना चिकटलेला मैदा आणि विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' पद्धतीने करा शरीर डिटॉक्स, पोट होईल स्वच्छ
Body Detox: दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात फराळ आणि मिठाई आणली जाते. गोड पदार्थांशिवाय सणवार साजरा झाल्यासारखे वाटत नाही. चकली, चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळे इत्यादी पारंपरिक पदार्थांसोबतच इतर गोड आणि तिखट पदार्थ सुद्धा घरी विकत आणले जातात. वर्षभरानंतर घरात बनवलेली चकली, चिवडा अतिशय आवडीने खाल्ला जातो. पण वारंवार तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर त्याचे परिणाम होतात. व्यायामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वजन झपाट्याने वाढते आणि पोट फुगणे, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि दिवसभर सुस्ती आल्यासारखे वाटू लागते. चवीला गोड लागणारे पदार्थ शरीराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात.(फोटो सौजन्य – istock)
वाढती ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या कमी करण्यासाठी आहारात बदल करण्यासोबतच वेगवेगळे डिटॉक्स पेयांचे किंवा सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते. पण नियमित सप्लिमेंट्स घेतल्यामुळे किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे शरीरात साचून विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी हे घरगुती उपाय केल्यास नक्कीच परिणाम दिसून येईल आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. नैसर्गिकरित्या शरीर स्वच्छ केल्यास शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.
सणावारांच्या दिवसांमध्ये खूप जास्त गोड, तिखट किंवा मिठाईतील पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते आणि झपाट्याने वजन वाढू लागते. तसेच अनेक पाणी पिण्याचा विसर पडून जातो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लास कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीराचे संतुलन कायम तसेच राहते. द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यासाठी, पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी, किडनी डिटॉक्स करण्यासाठी कोमट पाणी प्रभावी ठरते.
रोजच्या आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन करण्यासाठी आहारात फायबर खाण्याचा सल्ला दिला जातो. पपई, सफरचंद, पेरू यांसारखी फळे, ओट्स, दलिया, हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या कोशिंबिरीचा आवर्जून आहारात समावेश करावा. फायबर खाल्ल्यामुळे आतड्यांची हालचाल सक्रिय राहते आणि मलविसर्जन नियमित होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता किंवा शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी फायबरचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
दिवाळीनंतर तिखट, तेलकट किंवा पचनास जड असलेले पदार्थ अजिबात खाऊ नये. त्याऐवजी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी आणि अजिबात साखरेचा वापर न करता बनवलेले नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. नारळपाण्यामध्ये पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात, ज्यामुळे शरीराचे संतुलन कायम टिकून राहते. लिंबामध्ये विटामिन सी असते, ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होतात.
Ans: नाही. मैदा आतड्यांना चिकटून राहतो किंवा तिथे साचतो, हा एक गैरसमज आहे. शरीराची पचनसंस्था अन्नाचे पचन करून टाकाऊ पदार्थ नैसर्गिकरीत्या बाहेर टाकते.
Ans: नाही. शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचे काम यकृत आणि मूत्रपिंड नैसर्गिकरीत्या करतात.
Ans: मैदा हा रिफाइंड पीठाचा प्रकार असल्याने त्यात फायबरचे प्रमाण कमी असते. त्याचे अतिसेवन आणि फायबरयुक्त पदार्थांचा अभाव यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.






