Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: ४५ अंशांचे हाड कापले अन् पाठ सरळ! अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसने वाकलेल्या तरुणाला नवजीवन

जीवनशैलीतील बदलांमुळे हाडांसंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसचे निदान झाल्यानंतर पाठीच्या मणक्याला गंभीर हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. पण गंभीर समस्यांनी त्रस्त असलेल्या ३२ वर्षीय तरुणाची पाठ जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी पुन्हा सरळ केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2026 | 09:17 AM
४५ अंशांचे हाड कापले अन् पाठ सरळ! अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसने वाकलेल्या तरुणाला नवजीवन

४५ अंशांचे हाड कापले अन् पाठ सरळ! अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसने वाकलेल्या तरुणाला नवजीवन

Follow Us
Follow Us:

गेल्या सहा वर्षांपासून पाठदुखी आणि वाढत्या ताठरपणामुळे अक्षरशः धनुष्याप्रमाणे पुढे वाकलेल्या ३२ वर्षीय तरुणाची पाठ जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी पुन्हा सरळ केली. अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसमुळे मणक्यांची हालचाल पूर्णपणे बंद झालेल्या या तरुणाच्या कंबरेच्या मणक्यातून तब्बल ४५ अंशांचा त्रिकोणी हाडाचा तुकडा काढून मणका सरळ करण्यात आला. सुमारे सात ते आठ तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर तो पुन्हा ताठ उभा राहून चालू लागला आहे.(फोटो सौजन्य – istock)

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

हिंगोली येथील शिवराज महादेव जवने याला २०२० पासून पाठदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, वेदना आणि ताठरपणा वाढत गेल्याने २०२१ मध्ये अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसचे निदान झाले. मणका हळूहळू पुढे वाकत गेल्याने २०२२ मध्ये त्याला बँकेतील नोकरी सोडावी लागली. पुढे कमरेखालील सांध्यावरही ताण आल्याने २०२५ मध्ये त्याच्यावर हिप रिप्लेसमेंट करण्यात आले.

रुग्णाला दिला डिस्चार्ज, फिजिओथेरपी सुरू:

यानंतर मणक्याच्या विकृतीवर उपचारासाठी तो जे. जे. रुग्णालयात दाखल झाला. १५ जुलैला दाखल झाल्यानंतर १७ जुलैला शस्त्रक्रिया करण्यात आली. गंभीर वक्रतेमुळे रुग्णाला ऑपरेशन टेबलवर झोपवणेही आव्हानात्मक होते. विशेष पद्धतीने त्याला झोपवल्यानंतर कंबरेच्या मणक्यातून ४५ अंशांचा हाडाचा तुकडा काढण्यात आला.

Surya Hospital: पालकांनो सावधान! खेळण्यात दडला जीवघेणा धोका, २ वर्षांच्या चिमुकल्याने गिळले शक्तिशाली चुंबक; आतड्यांना पडली छिद्रे

त्यानंतर मणका सरळ करून रॉड आणि स्क्रूच्या साहाय्याने स्थिर करण्यात आला. डॉ. धीरज सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रक्रिया केली. २३ जुलैला शिवराजला डिस्वार्ज देण्यात आला असून फिजिओथेरपी सुरू आहे. ॲकायलोझिंग 66 स्पॉन्डिलायटिसचे वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास मणका पुढे वाकत जातो. विकृती वाढल्यास शस्त्रक्रियेतील जोखीमही वाढते, अशी माहिती डॉ. धीरज सोनवणे, अस्थिरोग व स्पाइन तज्ज्ञ, जे. जे. रुग्णालय यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय?

    Ans: अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस हा मणक्यांवर परिणाम करणारा दीर्घकालीन दाहक आजार आहे. यामुळे पाठदुखी, कडकपणा आणि काही रुग्णांमध्ये मणका वाकण्यासारखी समस्या होऊ शकते.

  • Que: अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिसमुळे पाठ का वाकते?

    Ans: दीर्घकाळ दाह राहिल्यास मणक्यांमधील सांधे आणि अस्थिबंधने कडक होऊन मणके एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. त्यामुळे मणक्याची लवचिकता कमी होऊन पुढे वाकलेली स्थिती निर्माण होऊ शकते.

  • Que: अँकायलोझिंग स्पॉन्डिलायटिस पूर्णपणे बरा होतो का?

    Ans: हा दीर्घकालीन आजार आहे. औषधे, फिजिओथेरपी, व्यायाम आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया यामुळे लक्षणे आणि गुंतागुंत नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Bone cut at a 45 degree angle and the back is straight a new lease of life for a young man stooped by ankylosing spondylitis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • Health Department
  • Health Updates
  • J J Hospital Mumbai

संबंधित बातम्या

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज
1

Pregnancy Prevention:गर्भधारणा टाळण्यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे! गर्भनिरोधक वापरासोबत समुपदेशनाची गरज

World Environmental Health Day: मुंबईच्या पर्यावरणाचा आरोग्यावर वाढता ताण! उष्णता, आर्द्रता आणि डासजन्य आजारांचा एकत्रित विळखा
2

World Environmental Health Day: मुंबईच्या पर्यावरणाचा आरोग्यावर वाढता ताण! उष्णता, आर्द्रता आणि डासजन्य आजारांचा एकत्रित विळखा

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
3

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार
4

Amravati News: कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.