फोटो सौजन्य: Freepik
दरवर्षी पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदल, पाणी साचणे आणि अशा अनेक परिस्थिथींमुळे जंतूंची वाढ होत असते. हे जंतू विशेषत: लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम करतात ज्यांची प्रतिकारशक्ती फारशी मजबूत नसते. पावसाळ्याशी संबंधित आजारांच्या आरोग्य अहवालांवर नजर टाकली तर एकीकडे डोकेदुखी, मायग्रेन, पोटातील संसर्ग, डायरिया, लेप्टोस्पायरोसिस, न्यूमोनिया, सायनुसायटिस असे अनेक प्रकारचे जिवाणू संसर्ग देशभरात नोंदवले गेले आहेत. जी खरंच खूप गंभीर बाब आहे.
पावसाळ्यात हवामान, वातावरण आणि अन्य संबंधित घटकांमुळे मेंदूच्या संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंची वाढ होते. मुसळधार पाऊस आणि वाढलेली आर्द्रता जीवाणू, विषाणू आणि अमिबा यासह विविध सूक्ष्मजीवांच्या वाढीस परवानगी देते ज्यामुळे गंभीर संक्रमण होऊ शकतात. साचलेले पाणी हे मेंदूच्या संसर्गाचा धोका वाढण्याचे मुख्य कारण आहे.
पावसाळ्यात ब्रेन इन्फेकशन!
पावसाळ्यात भारताच्या किनारपट्टी लगत भागात मेंदूच्या संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती असते. या भागात डासांच्या वाढत्या प्रजननामुळे व्हायरल एन्सेफलायटीस आणि इतर मेंदू संसर्ग होतो. या मेंदूच्या संसर्गामुळे ताप, डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
याला थांबवावे तरी कसे?
पावसाळ्यात आरोगी राहणे गरजेचे आहे. तसेच या मोसमात उत्तोमोत्तम आहाराचे सेवन करणे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही पावसाळ्यात कुठल्यातरी धबधब्यात किंवा एकदा पूलमध्ये पोहण्यात जात असाल तर ते पाणी सर्वप्रथम दूषित आहे की नाही हे जाणून घ्या. दूषित पाण्यात पोहल्याने त्या पाण्यातील जंतू तुमच्या कानावाटे शरीरात प्रवेश मिळवू शकतात.