स्मार्ट स्किनकेअर रुटीन फॉलो करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो, त्वचा राहील कायमच फ्रेश आणि हायड्रेट
महागड्या क्रीम्स आणि सीरम लावून त्वचा सुंदर दिसेल हे दिवस आता गेले. ‘ग्लास स्किन’ मिळवण्यासाठी आता चांगला आहारच गरजेचा आहे, असं जैन-झी पिढी ठामपणे सांगत आहे. बाहेरून लावण्याच्या उत्पादनांपेक्षा, आतून मिळणारं पोषण त्वचेला खरी चमक देते, हा विश्वास आता ब्युटी ट्रेंडमध्ये मोठा बदल घडवत आहे. शरीराला बाहेरून लावलेल्या गोष्टीपेक्षा आतून दिलेलं पोषण जास्त महत्त्वाचं आहे, हा, विचार जेन-झी पिढीमध्ये खूप पक्का झाला आहे. याच ट्रेडमुळे सोशल मीडियावर लाखो लोकांनी ट्राय केलेल्या आणि चांगला परिणाम मिळाल्याचं सांगितलेल्या तीन मुख्य सॅलड रेसिपीबद्दल आपण जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन तिच्या त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी अनेक वर्ष हे सॅलड नियमितपणे खायची. यातील घटक त्वचेला आवश्यक असलेलं प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स पुरवतात. कसे बनवायचे : शिजवलेली किनोआ किया गव्हाचा दलिया हा याचा मुख्य घटक आहे. एका भांड्यात एक कप किनोआ घेऊन त्यात बारीक चिरलेली काकडी, पार्सलीची पानं, पुदिन्याची पानं आणि लाल कांदा घाला, चवीसाठी यात थोडे भाजलेले पिस्ते आणि फेटा चीज घातल्यास चव आणखी वाढते.
पिंपल्स आणि चेहऱ्यावरचे काळे डाग घालवण्यासाठी इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर या गाजराच्या सॅलडची तुफान चर्चा आहे. यामागचं वैज्ञानिक कारण असं आहे की, गाजरामधील खास फायबर शरीरातील अतिरिक्त इस्ट्रोजेन हार्मोनला बाहेर काढायला मदत करतं. ज्यांना हार्मोन्सच्या गडबडीमुळे पिंपल्स येतात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. कसे बनवायचे दोन मध्यम आकाराची गाजरं घेऊन ती स्वच्छ धुवा आणि त्यांची सालं काढा. नंतर पिलरच्या मदतीने त्याचे लांब आणि पातळ काप करा. एका भांड्यात हे गाजराचे काप घेऊन त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल, अर्ध्या लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि काळीमिरी पूड घाला.
त्वचा नेहमी फेश आणि चमकदार दिसण्यासाठी हायड्रेशन, म्हणजेच शरीरात पुरेसं पाणी असण खूप गरजेचं आहे. काकडी मुख्य घटक असलेल हे सॅलड त्वचेला आतून पाणी देण्यासारखंच आहे. कसे बनवायचे: दौन काकड्या न सोलता पातळ गोल चकत्यांमध्ये कापा. त्यात फेटा चीज कुस्करून घाला, योड ओरेगेंनो, ऑलिव्ह ऑईल आणि रेड वाईन व्हिनेगर घालून चांगलं मिक्स करा. हवं असल्यास बोडा मधही घालू शकता. ९५ टक्के पाणी असलेली काकडी त्वचेवरील सूज कमी करण्यास मदत करते.






