Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का? वाढलेला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय नक्की करा

रक्तात वाढलेली साखर केवळ शरीरालाच नाहीतर डोळ्यांना सुद्धा हानी पोहचवते. यामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या फुटून जातात आणि दृष्टी कायमची जाते. त्यामुळे वाढत्या मधुमेहापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात या पदार्थांचे नक्कीच सेवन करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2026 | 08:04 AM
मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का? वाढलेला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा

मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का? वाढलेला चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा

Follow Us
Follow Us:

मधुमेह झाल्यानंतर डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते का?
डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी उपाय?
मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का?

जगभरात मधुमेह, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक आणि इतर गंभीर आजाराच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह हा आजार कधीच बरा होत नाही. आजाराचे निदान झाल्यानंतर संपूर्ण आयुष्यभर गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. रक्तात साखर वाढल्यानंतर संपूर्ण शरीरात त्याची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अंगाला खाज येणे, सतत तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पण वेळीच मधुमेहाचे निदान न झाल्यास त्याचे परिणाम डोळ्यांवर सुद्धा दिसू लागतात. यामुळे डायबेटिक रेटिनोपॅथीचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. रक्तात साखरेचे प्रमाण खूप जास्त झाल्यामुळे डोळ्यांच्या पडद्यावरील रक्तवाहिन्या कमकुवत आणि डोळ्यांची दृष्टी धूसर होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३०० दिवस करतात ‘या’ पांढऱ्या पदार्थाचे सेवन, जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ आणि शरीराला होणारे फायदे

रक्तात वाढलेली साखर संपूर्ण शरीर आतून पोखरून काढते. त्यामुळे कोणतेही लक्षणे दिसू लागल्यानंतर तातडीने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा डोळ्यांसह इतर अवयवांनासुद्धा हानी पोहचू शकते. याशिवाय मोतीबिंदू आणि काचबिंदूचा धोका वाढतो. डोळ्यांच्या नसा आतून कमकुवत झाल्यामुळे दृष्टी कमी होते आणि डोळ्यांना हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळे दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर केवळ नंबर न तपासता मधुमेहाची चाचणी करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

मधुमेहाचा डोळ्यांवर कसा परिणाम होतो?

रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने लक्षणे वाढतात आणि शरीराला हानी पोहचते. प्रमाणापेक्षा जास्त साखर वाढल्यामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्यातून द्रव गळू लागतो. यामुळे डोळ्यांची दृष्टी कायमची जाऊ शकते. तसेच काहीवेळा डोळ्याच्या भिंगाचा आकार तात्पुरता बदलून जातो. डोळ्यांमधील पाण्याचा दाब वाढल्यामुळे मुख्य नसांवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच मधुमेह चाचणी करणे आवश्यक आहे.

Colon Cancer: आतड्यांच्या कॅन्सरचा धोका कमी करायचा आहे? रोज खा ‘हे’ सुपरफूड्स

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती उपाय:

मधुमेहासारख्या अतिशय सामान्य पण गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे फार आवश्यक आहे. याशिवाय घरगुती उपाय केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. दिवसभरात ३० मिनिट चालणे फार आवश्यक आहे. यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. तसेच पांढरा भात, साखर, मैदा इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. प्रत्येक ३ महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने HbA1c चाचणी करणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या मधुमेहामुळे डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी गाजर, रताळे आणि पपई इत्यादी बीटा-कॅरोटीन असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मधुमेहामुळे डोळ्यांची नजर कायमची जाऊ शकते का?

    Ans: मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढले राहिल्यास डोळ्यांच्या पडद्यावर (रेटिना) परिणाम होऊ शकतो. योग्य वेळी उपचार न केल्यास दृष्टी कमी होण्याचा धोका वाढू शकतो.

  • Que: वाढलेला चष्म्याचा नंबर कमी करता येतो का?

    Ans: चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी कोणताही घरगुती उपाय हमखास सिद्ध झालेला नाही. मात्र डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

  • Que: डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी काय करावे?

    Ans: हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आहारात समावेश करणे, स्क्रीन टाइम नियंत्रित ठेवणे, पुरेशी झोप घेणे आणि नियमित नेत्र तपासणी करणे फायदेशीर ठरते.

Web Title: Can diabetes cause permanent vision loss definitely try these remedies to reduce your spectacle prescription

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • diabetes
  • eye care
  • home remedies for Diabetes

संबंधित बातम्या

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
1

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
2

Diabetes: फक्त साखर नाही! भारतीयांमध्ये मधुमेह वाढण्यामागे ‘ही’ 6 कारणं! तज्ज्ञांच्या संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.