Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या गर्मीमध्ये हार्ट अटॅक येतो का? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ‘का’ वाढतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या यामागील कारण

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हृदयविकारचा झटका किंवा हार्ट स्टोक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेर जाताना शरीराची काळजी घेणे फार आवश्यकता आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 12, 2026 | 05:30 AM
कडाक्याच्या गर्मीमध्ये हार्ट अटॅक येतो का? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 'का' वाढतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या यामागील कारण

कडाक्याच्या गर्मीमध्ये हार्ट अटॅक येतो का? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 'का' वाढतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या यामागील कारण

Follow Us
Follow Us:

जगभरात हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. उष्माघात, डिहाड्रेशन तर काहीवेळा हृद्यासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिसवांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडून जाते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गुठळ्या, अतालता, कमी रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येऊन कोणत्याही क्षणी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा किडनीच्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप जास्त असते.(फोटो सौजन्य – istock)

रक्तदान करायला भीती वाटते? जाणून घ्या सामान्य गैरसमज आणि त्यामागील वास्तव, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

हार्ट अटॅक येण्याच्या प्रमुख कारण केवळ रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल नसून शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, बिघडलेली इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हृदयावर जास्तीचा तणाव येतो आणि रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया कडाक्याच्या उष्णतेचा हृदयाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि यामागील कारणे.

मानवी शरीराचे तापमान स्थिर राहण्यासाठी अंतर्गत अनेक शारीरिक हालचाली होतात. जेव्हा बाहेरील तापमानामध्ये वाढ होते, तेव्हा शरीर त्वचा आणि घामाच्या माध्यमातून उष्णता बाहेर टाकण्यास सुरुवात करते. यामुळे त्वचेवरील रक्तवाहिन्या रुंदावतात आणि तिथला रक्तप्रवाहाचा वेग वाढतो. यामुळे हृदयाला जास्तीची हालचाल करावी लागते. हृदयावर आलेला जास्तीचा तणाव निरोगी व्यक्ती सहन करते पण वाढलेले वय आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना हा तणाव सहन होत नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.

डिहायड्रेशन आणि रक्ताच्या गुठळ्या:

उष्णता वाढल्यामुळे घामावाटे शरीरातील पाणी आणि सोडियम-पोटॅशियमसारखे अतिशय महत्वाचे घटक बाहेर पडून जातात. यामुळे शरीरात डिहायड्रेशनचा धोका वाढण्याची शक्यता असते. वाढत्या डिहायड्रेशनचा थेट हद्य आणि रक्तवाहिन्यावर होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर रक्ताची पातळीसुद्धा कमी होऊन जाते. रक्त नेहमीपेक्षा जास्त घट्ट किंवा जाड होते ज्यामुळे रक्त पंप करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. या प्रक्रियेमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. तयार झालेल्या गुठळ्या हृदयाच्या धमन्यांमध्ये अडकल्या तर हार्ट अटॅक किंवा मेंदूमध्ये स्ट्रोक येण्याची जास्त शक्याता असते.

रक्तात वाढलेल्या साखरेमुळे अंगाला सतत खाज येते? मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

अतिउष्णतेमुळे हृदय निकामी होण्याची कारणे:

डिहायड्रेशन आणि रक्तवाहिन्या रुंदावल्यामुळे शरीराचा रक्तदाब अचानक कमी होऊन जातो. यामुळे हृदयाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही. घामावाटे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे हृदयाची विद्युत यंत्रणा बिघडून शरीराला धोका निर्माण होतो. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेर जाणे टाळावे. हृदयविकार किंवा हाय बीपीसाठी दिल्या जाणाऱ्या डायुरेटिक्स गोळ्या शरीरातील पाण्याची पातळी कमी करून टाकतात. यामुळे उष्णतेचा धोका वाढतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कडाक्याच्या उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो का?

    Ans: होय, अतिउष्ण हवामानामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. उष्णतेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते, त्यामुळे काही लोकांमध्ये हृदयाशी संबंधित धोका वाढू शकतो.

  • Que: उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका का वाढू शकतो?

    Ans: जास्त उष्णतेमुळे शरीरातून घामाद्वारे पाणी आणि क्षार कमी होऊ शकतात. यामुळे डिहायड्रेशन, रक्तदाबातील बदल आणि हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

  • Que: कोणत्या लोकांनी उन्हाळ्यात हृदयाची विशेष काळजी घ्यावी?

    Ans: हृदयविकार असलेले, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असलेले, वृद्ध व्यक्ती आणि जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

Web Title: Can extreme heat trigger a heart attack why does the risk of heart attacks increase during summer find out the reasons behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • heart attack
  • Heart attack prevention

संबंधित बातम्या

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
1

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
2

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
3

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.