Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सर झाला म्हणजे करिअर संपले का? उपचारानंतर पुन्हा ‘कमबॅक’ शक्य! डॉक्टरांचा सल्ला ठरेल गेमचेंजर

Cancer Patients Treatment and Workplace Support: कॅन्सरचे निदान झाले म्हणजे करिअरला पूर्णविराम मिळतोच असे नाही. योग्य उपचार, नियोजन आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यावसायिक आयुष्य सुरू ठेवणे शक्य आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 27, 2026 | 05:22 PM
photo- AI generated

photo- AI generated

Follow Us
Follow Us:
  • कॅन्सरचं निदान म्हणजे करिअरचा शेवट नाही
  • योग्य उपचारांनी पुन्हा कामाची नवी इनिंग
  • डॉक्टरांचा सल्ला आणि सहकार्य ठरते महत्त्वाचे
पुणे : कॅन्सरचे निदान झाल्यानंतर रुग्णाला केवळ आजाराचीच चिंता नसते, तर त्याच्या उपचारांचा नोकरीवर आणि करिअरवर काय परिणाम होईल, याचीही भीती असते. “उपचारांमुळे माझे काम थांबेल का?”, “करिअरमध्ये ब्रेक पडला तर पुढे काय?”, “पुन्हा पूर्वीसारखे काम करता येईल का?” असे प्रश्न मनात येतात. मात्र कॅन्सरचे निदान झाले म्हणजे करिअरला पूर्णविराम मिळाल असे नाही. योग्य उपचार, नियोजन आणि आवश्यक सहकार्याच्या मदतीने अनेक रुग्ण उपचारांसोबतच आपल्या व्यावसायिक आयुष्याचीही वाटचाल सुरू ठेवू शकतात.

LDL cholesterol: बाहेरच खात नाही तरी खराब कोलेस्ट्रॉल वाढतंय? तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

कॅन्सरच्या उपचारांमध्ये केमोथेरपी, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेनंतर येणारा थकवा, अशक्तपणा, मळमळणे, झोपेच्या समस्या आणि भावनिक ताण यांसारख्या अडचणी येऊ शकतात. मात्र सर्व रुग्णांना पूर्णपणे काम थांबवण्याची आवश्यकता असतेच असे नाही. अनेक जण वर्क फ्रॉम होम, स्वतःच्या सोयीनुसार कामाचे तास किंवा कमी कामाचा ताण असलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारून आपले करिअर सुरू ठेवतात.

कर्करोग तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार उपचारादरम्यान काम सुरू ठेवल्याने आर्थिक बाबतीत सुरक्षितता तर मिळतेच शिवाय दैनंदिन दिनचर्या कायम राहिल्याने मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. कामामुळे रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास आणि आजारापासून लक्ष दुसरीकडे वळण्यास मदत होते. तथापि शरीराच्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्याचा प्रयत्न टाळणे आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती, संतुलित आहार, नियमित फॉलो-अप आणि कार्यालयीन सहकाऱ्यांचा आधार उपचारादरम्यान तितकाच महत्त्वाचा ठरतो.

डॉ. सिद्धेश त्र्यंबके (क्लिनिकल आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट,टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव) म्हणाले, कॅन्सरचे निदान म्हणजे करिअरचा शेवट नव्हे. आजच्या आधुनिक उपचार पद्धतींमुळे अनेक रुग्ण उपचार घेत असतानाही आपले व्यावसायिक आयुष्य सुरू ठेवू शकतात. प्रत्येक रुग्णाची शारीरिक क्षमता आणि उपचारांचा प्रकार वेगळा असतो, त्यामुळे आपल्या कामाचे स्वरूप त्यानुसार ठरवणे गरजेचे आहे. कुटुंबीय आणि वैद्यकीय टीम यांचे सहकार्य मिळाल्यास रुग्ण उपचार आणि नोकरी यामध्ये योग्य समतोल साधू शकतात. एक लक्षात असू द्या ती प्रत्येक रुग्णाची उपचारपद्धती आणि शारीरिक क्षमता वेगळी असते. काहींना उपचारांदरम्यान कामापासून ब्रेक घ्यावा लागू शकतो, तर काही जण कामाचे तास किंवा स्वरूप बदलून काम सुरू ठेवू शकतात. बऱ्याचदा रोजच्या कामाशी जोडलेले राहणे हे त्या रुग्णांच्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते आणि त्यांना सामान्य जीवन जगण्याचा आत्मविश्वास देते.

डॉ. ललित बन्सवाल(ऑन्को सर्जन, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे) सांगतात की, कर्करोगाचे निदान झाले म्हणजे करिअर संपले असे नाही. योग्य वैद्यकीय उपचार, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचा आधार तसेच कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण मिळाल्यास अनेक रुग्ण उपचारानंतर पुन्हा कामावर रुजू होऊ शकतात आणि आपले करिअर पुढे सुरू ठेवू शकतात.

कामाच्या ठिकाणी कर्करोगाबाबत जनजागृती करणे आणि उपचार घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष आधार देणारी धोरणे अंमलात आणली गेली पाहिजेत. त्यामुळे रुग्णांना त्यांची नोकरी सुरू ठेवण्यास आणि जीवनाचा दर्जा चांगला राखण्यास मदत होते. मात्र, उपचार आणि आरोग्याला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रकृती सुधारत गेल्यावर हळूहळू काम सुरू करावे.

कर्करोगामुळे आयुष्याची दिशा काही प्रमाणात बदलू शकते, मात्र त्याचा अर्थ करिअरचा शेवट झाला असा अजिबात नाही. आपल्या आरोग्याच्या गरजा समजून घेऊन आवश्यक मदत स्वीकारावी आणि त्यानुसार पुढील वाटचालीचे नियोजन करावे.

Transparent Phone Cover: पिवळा पडलेला फोन कव्हर फेकू नका, वापरा ‘या’ सोप्या टिप्स; काही मिनिटांत होईल चकाचक

Web Title: Career comeback after cancer treatment need workplace support and doctors advise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 05:22 PM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • Career

संबंधित बातम्या

Breast Cancer Awareness: कौटुंबिक इतिहास नाही, लक्षणे नाहीत; तरीही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला सल्ला
1

Breast Cancer Awareness: कौटुंबिक इतिहास नाही, लक्षणे नाहीत; तरीही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या
2

Imran Khan Education: इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस! नेमकं किती शिकला आहे ‘हा’ अभिनेता? जाणून घ्या

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज
3

Foreign Language Career : जापानी, जर्मन की फ्रेंच? परदेशी भाषा शिकून मिळवा लाखो रुपयांचे पॅकेज

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..
4

Neha Bora Biography: जंतर मंतर आंदोलनाचा नवा चेहरा नेहा बोरा कोण? जाणून घ्या त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.