फोटो सौजन्य: गुगल
तरुण्यात प्रवेश केल्यानंतर म्हणजेच महाविद्यालयीन मुलींबाबत सगळंच नवं असतं. अशा वेळी एकाबाजूला करिअर आणि दुसऱ्या बाजूला खुणानणारं जग. मात्र आयुष्यात आपल्याला काय करायंच आहे हे निश्चित असणं गरजेचं आहे. प्रेम हे आयुष्यातली खूप सुंदर जाणीव आहे पण त्याच बरोबर आपलं करिअर आणि त्याचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं देखील तितकच महत्वाचं आहे.
विशेषतः आजच्या काळात जिथे करिअर, नाती आणि स्वतःची ओळख यात समतोल साधणे खूप गरजेचं आहे. २५ वर्षांपूर्वी म्हणजे आयुष्यातील एक असा टप्पा असतो जिथे आपण शिकतही असतो आणि खूप महत्त्वाचे निर्णयही घेतो. वयाच्या 25 व्या वर्षांपूर्वी मुलींना कोणत्या चुका करणं टाळावं हे पाहुयात..
फक्त इतर काय करत आहेत ते पाहून दिशा निवडू नका. तुमचं काय करायला आवडतं, कुठे तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात हे शोधा. घरातील कोणीतरी अनुभवी माणसं सांगतात म्हणून करिअर निवडू नका. करिअरबाबत तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय जमतं याचा विचार करा.
स्वत:ची मतं मांडताना घाबरणं- रिलेशनशिपमध्ये असताना समोरचा व्यक्ती काय म्हणेल म्हणून तुम्हाला तुमची मतं मांडता येत नसेल तर या नात्याला काहीही अर्थ नाही. हे वेळीच ओळखा.
फक्त डिग्रीवर अवलंबून न राहता, संवाद कौशल्य, टेक्निकल स्किल्स, आणि क्रिएटिव्ह थिंकिंग यासारख्या स्किल्स विकसित करा. तुमचा पार्टनर तुम्हाला करिअरसाठी पाठिंबा दोतोय का हे पाहणं गरजेचं आहे.
जगाचा विचार करणं- कोण कायम म्हणेल या विचाराने अनेकदा खूप काही स्वत:च्या आयुष्यात चांगलं करायचं असेल तर ते करताना आत्मविश्वास कमी पडतो. त्यामुळे जगाचा विचार करणं टाळा.
इतरांसाठी जगणं- रिलेशनशिपमध्ये असताना समोरच्याच्या आनंदासाठी तुम्ही त्याच्या मताप्रमाणे प्रत्येक वेळी वागत असाल तर ते चुकीचं आहे.
पैशाचा योग्य उपयोग शिकणे, सेव्हिंग आणि गुंतवणूक याची सुरुवात लवकरच करावी.
स्वतःला हरवून बसणे – कोणत्याही नात्यात स्वतःची ओळख, स्वाभिमान आणि स्वतंत्र विचार राखा.
स्वतःच्या भविष्याकडे दुर्लक्ष करून नातं टिकवण्याचा प्रयत्न – जे नातं तुमच्या वाढीत अडथळा आणतं, ते टिकवणं योग्य नाही.
रेड फ्लॅग्सकडे दुर्लक्ष करणं – controlling behavior, disrespect, किंवा manipulation यासारख्या गोष्टी ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहा.फक्त ‘लग्नाचं’ उद्दिष्ट ठेवण हे तुम्ही स्वत:वर केलेला अन्याय आहे.
रेड फ्लॅग्सकडे दुर्लक्ष करणं – controlling behavior, disrespect, किंवा manipulation यासारख्या गोष्टी ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहा.
फक्त ‘लग्नाचं’ उद्दिष्ट ठेवणं – रिलेशनशिप म्हणजे companionship, mutual growth आणि respect. केवळ विवाहासाठी संबंध ठेवणं ही चुकीची दिशा ठरू शकते.
स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासात काय करावं
स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चांगल्या सवयी आणि कलागुणांकडे लक्ष द्या.
चुकण्याची भीती बागळणं टाळा
माझं चुकलं तर काय ही भिती काढून टाका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवा.
“No” म्हणायला शिका –
boundaries खूप महत्त्वाच्या आहेत
२५ वर्षांखाली वय म्हणजे करियर करण्यासाठीची वेळ असते. त्यामुळे करिअर, रिलेशनशिप आणि व्यक्तिमत्व या तिन्ही घटकांचा विचार करुन योग्य तो निर्णय घेणं. निर्णयांमध्ये अती भावनिक न होता तटस्थपणे निर्णय घ्यावेत, असं तज्ज्ञ सांगतात.