KKR कडून रिलीज झाल्यानंतर Mustafizur Rahman ला ९.२ कोटी मिळणार की नुकसान होणार? (Photo Credit - X)
नेमकं प्रकरण काय?
डिसेंबर २०२५ मध्ये अबू धाबी येथे झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सला चुरस देत केकेआरने मुस्तफिजूरला आपल्या ताफ्यात घेतले होते. मात्र, बीसीसीआयने कोणत्याही ठोस कारणाशिवाय, केवळ “सध्याच्या घडामोडींचे” कारण देत त्याला बाहेर काढण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे, मुस्तफिजूर जखमी नाही किंवा त्याने कोणताही शिस्तभंग केलेला नाही, तरीही त्याला हा फटका बसला आहे.
९.२ कोटींचे नुकसान; विमा नियम काय सांगतात?
सामान्यतः आयपीएलमधील खेळाडूंचा पगार विमाकृत असतो. जर एखादा खेळाडू स्पर्धेदरम्यान किंवा ट्रेनिंग कॅम्पमध्ये जखमी झाला, तर त्याला विम्याद्वारे भरपाई मिळते. परंतु, मुस्तफिजूरचे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे आहे. मुस्तफिजूरला दुखापतीमुळे नाही तर बोर्डाच्या धोरणात्मक निर्णयामुळे काढले आहे. सध्याच्या विमा नियमांमध्ये अशा राजकीय किंवा धोरणात्मक कारणांसाठी नुकसानभरपाईची कोणतीही तरतूद नाही.
केकेआरची बाजू
तांत्रिकदृष्ट्या केकेआर त्याला मानधन देण्यास बांधील नाही. सूत्रांनुसार, विमा कंपन्या अशा अनपेक्षित प्रकरणांना कव्हर करत नाहीत, त्यामुळे केकेआरकडून त्याला पैसे मिळण्याची शक्यता शून्य आहे.
राजकीय तणाव आणि बीसीबीचा पवित्रा
भारत आणि बांगलादेशमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला असून मुस्तफिजूरला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र मागे घेतले आहे. तसेच २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारताचे सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली आहे.
कायदेशीर लढाई का कठीण?
मुस्तफिजूरकडे कायदेशीर पर्याय मर्यादित आहेत. आयपीएल हे भारतीय कायद्यानुसार चालते. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद न्यायालयात जाणे हे कोणत्याही परदेशी खेळाडूसाठी अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ असते. तसेच, दोन्ही देशांतील अस्थिर राजकीय संबंध पाहता, कोणताही खेळाडू कायदेशीर संघर्षाचा धोका पत्करण्यास तयार नाही.
मुस्तफिजूर रहमान IPL वाद! कोणाच्या आदेशावरून बांगलादेशच्या गोलंदाजाला दाखवला बाहेरचा रस्ता






