Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा…

Charholi Budruk Village : इतिहास, नैसर्गित सुंदरता आणि ऐतिहासिक वस्तूंनी भरलेले हे गाव साधे असले तरी इथे एक वेगळाच अनुभव मिळतो. शिवरायांपासून संत ज्ञानेश्वरांपर्यंत याचा संबंध इतिहासाशी जोडलेला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2026 | 08:22 AM
आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा...

आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा...

Follow Us
Follow Us:
  • पुण्याजवळील चऱ्होळी बुद्रुक हे गाव इतिहास, निसर्ग आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध ऑफबीट पर्यटनस्थळ आहे.
  • गावात प्राचीन मंदिरं, जुने वाडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात.
  • संत ज्ञानेश्वर महाराजांचा या गावाशी संबंध असल्याने या ठिकाणाला धार्मिक महत्त्वही आहे.
पर्यटन नेहमी आपल्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. कामाच्या तणावापासून दूर जाण्यासाठी किंवा शहरातील गजबटापासून दूर जाण्यासाठी पर्यटनाचा पर्याय सर्वोत्तम ठरतो. फिरायला जाण्यासाठी प्रत्येकाची निवड प्रसिद्ध ठिकाणांकडे अधिक असते पण तुम्हाला माहिती आहे का? मागील काही काळापासून ऑफ बीट डेस्टीनेशनचा ट्रेंड भरपूर वाढला आहे. यात लोक अशा ठिकाणांना भेट देतात जे निसर्गाशी जोडलेले असतात आणि या ठिकाणांची माहिती फार लोकांना नसते ज्यामुळे इथे गर्दी नसते आणि शांततामय वातावरणाचा अनुभव घेता येतो. आज या लेखात आपण महाराष्ट्रातील काही अशा गावांची माहिती जाणून घेणार आहोत जे पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय ठरतात.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

चऱ्होळी बुद्रुक गाव

पुण्याजवळील इंद्रायणी नदीकाठी वसलेले आणि आळंदीपासून अगदी ४-५ किलोमीटर लांब असलेले हे गाव बरेच जुने आहे. माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पेशव्यांच्या काळापर्यंत ऐतिहासिकदृष्ट्या याची महती फार प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला प्राचीन शस्त्रे. इतिहासकालीन वस्तू आणि प्रचीन मंदिर पाहता येतील. छत्रपतींच्या स्वराज्याशी जोडलेले तापकिर पाटील घराणं इथे फार लोकप्रिय आहे. आजही त्यांचे वंशज इथे राहत असल्याची माहिती आहे. हे गाव प्रामुख्याने शेती आणि दुग्ध व्यवसायासाठी ओळखले जाते. चऱ्होळी गावाची खासियत म्हणजे इथे जाताच जुन्या इतिहासाची झलक अनुभवता येते. गावात जुने वाडे आणि इतिहासकालीन अनेक वस्तूंचा संग्रह आहे ज्याला पाहण्याचं साैभाग्या या गावात गेल्यानंतर मिळतं. तुम्ही इथे वाघेश्वर मंदिर, खुरेश्वर महादेव मंदिर आणि काळभैरव या प्राचीन मंदिरांना भेट देऊ शकता.

कसे जायचे?

रेल्वे मार्ग- मुंबईहून पुण्याला जाणारी एक्सप्रेस पकडा. रेल्वे स्टेशनवर उतरा, पुणे स्टेशनला न जाता, पिंपरी स्टेशनवरून चऱ्होलीसाठी रिक्षा किंवा बसेस मिळतात.

रस्ते मार्ग – मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरुन आपला प्रवास सुरु करा. वाकड किंवा हिंजवडी फाट्यावरून पुणे शहराच्या दिशेने न जाता, आळंदी रोड पकडा. मोशी किंवा आळंदी मार्गे तुम्ही या गावात प्रवेश करु शकता.

बसचा मार्ग – दादर, ठाणे किंवा वाशीवरुन बस पकडा. पुणे येण्यापूर्वी निगडी किवा हिंजवडी फाट्यावर उतरा आणि इथून चऱ्होलीसाठी स्थानिक टॅक्सी किंवा PMPML बस पकडा.

10 हजारांच्या बजेटमध्ये घेऊ शकता रॉयल सफर! फिरून या असे देश जिथे भारतीय रुपयाला आहे बक्कळ किंमत…

ज्ञानेश्वर महाराज गावात राहून गेलेत

गावाविषयी आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे या गावात संत ज्ञानेश्वर महाराजांची मावशी राहत असल्याचे सांगण्यात येते. यामुळे महाराज अनेकदा गावात येऊन राहायचे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचा साठा देखील जपून ठेवलेला आहे. हेच कारण आहे की हे गाव इतिहास, संस्कृती आणि आध्यात्माचा एक चांगला संगम मानला जातो.

 

Web Title: Charholi budruk offbeat tourist village near pune is the best option to visit travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • maharashtra
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.