Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cooking Tips: मातीच्या भांड्यात पहिल्यांदा स्वयंपाक करताना चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी, नाहीतर…

How To Cook In Clay Pots: जर तुम्ही देखील मातीच्या भांड्यात पहिल्यांदाच जेवण बनवत असाल तर या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 04, 2026 | 04:53 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताय?
  • ‘या’ चुका टाळा
  • अन्यथा होईल नुकसान
भारतीय स्वयंपाकघरात पुन्हा एकदा मातीच्या भांड्यांचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पारंपरिक चव, आरोग्यदायी स्वयंपाक आणि नैसर्गिक पद्धतीमुळे अनेकजण आता क्ले पॉट किंवा मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याला प्राधान्य देत आहेत. मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न अधिक चविष्ट आणि पौष्टिक मानले जाते. मात्र ही भांडी पहिल्यांदाच वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न ठेवल्यास फुटू शकतात. त्यामुळे वापरण्यापूर्वी योग्य तयारी करणे आवश्यक आहे.

Health Tips: वजन कमी करायचंय? साखरेऐवजी वापरा ”हे हेल्दी पर्याय, क्रेविंग राहील कंट्रोलमध्ये

वापरण्यापूर्वी भांडे पाण्यात भिजवणे गरजेचे

नवीन मातीचे भांडे थेट गॅसवर ठेवणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, नवीन क्ले पॉट किमान काही तास पाण्यात भिजवून ठेवावा. त्यामुळे मातीतील छिद्रांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि भांडे उष्णता सहन करण्यास सक्षम बनते. काही जण रात्रभर भिजवून ठेवण्याचाही सल्ला देतात.

तेलाचा लेप लावणे

पाण्यातून काढल्यावर भांडे कोरडे होऊ द्यावे. नंतर त्याला आतील व बाहेरील बाजूस मोहरीच्या किंवा शेंगदाण्याच्या तेलाचा चांगला लेप लावावा. तेलाचा लेप लावल्यानंतर त भांडे १ ते २ दिवस कडक उन्हात पूर्णपणे सुकू द्यावे.

अचानक जास्त आचेवर ठेवू नका

मातीची भांडी तापमानातील अचानक बदल सहन करू शकत नाहीत. त्यामुळे सुरुवातीला नेहमी कमी आचेवर स्वयंपाक सुरू करावा. थंड भांडे थेट मोठ्या आचेवर ठेवल्यास ते फुटण्याची शक्यता वाढते. हळूहळू तापमान वाढवल्यास भांडे जास्त काळ टिकते आणि अन्नही व्यवस्थित शिजते.

धातूच्या चमच्यांचा वापर टाळा

मातीच्या भांड्यांचा आतील भाग नाजूक असतो. त्यामुळे स्वयंपाक करताना स्टील किंवा धातूचे चमचे वापरणे टाळावे. त्याऐवजी लाकडी किंवा सिलिकॉनचे चमचे वापरणे अधिक सुरक्षित मानले जाते. यामुळे भांड्याला ओरखडे लागत नाहीत आणि त्याची गुणवत्ता टिकून राहते.

स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या

मातीची भांडी स्वच्छ करताना हार्श डिटर्जंटचा वापर टाळावा. कोमट पाणी आणि मऊ स्क्रबर वापरून ती स्वच्छ करावीत. भांडे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच ठेवावे, अन्यथा त्यात दुर्गंधी किंवा बुरशी निर्माण होऊ शकते.

मातीच्या भांड्यातील अन्न अधिक आरोग्यदायी

तज्ज्ञांच्या मते, मातीच्या भांड्यात अन्न हळूहळू शिजते, त्यामुळे त्यातील नैसर्गिक चव आणि पोषक घटक टिकून राहतात. कमी तेलातही स्वादिष्ट पदार्थ तयार होतात. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेले अनेक लोक पुन्हा पारंपरिक मातीच्या भांड्यांकडे वळताना दिसत आहेत.

Parenting Tips: सुट्टीत मुलांचा स्क्रीनटाइम वाढलाय? मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Web Title: Clay pot cooking tips prevent breaking care instructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • clay pot
  • healthy food
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी
1

वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा
2

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

दररोजच्या ‘या’ सवयी किडनी आणि लिव्हरसाठी ठरू शकतात घातक; वेळेत बदला जीवनशैली
3

दररोजच्या ‘या’ सवयी किडनी आणि लिव्हरसाठी ठरू शकतात घातक; वेळेत बदला जीवनशैली

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण
4

Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या योग्य प्रमाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.