Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काखेत कायमच वेदना होतात? ब्रेस्ट कॅन्सरच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच करा उपचार

स्तनांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण कालातंराने ही लक्षणे आणखीनच तीव्र आणि आरोग्याचे नुकसान करतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2026 | 05:30 AM
काखेत कायमच वेदना होतात? ब्रेस्ट कॅन्सरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

काखेत कायमच वेदना होतात? ब्रेस्ट कॅन्सरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

स्तनांच्या कॅन्सरची लक्षणे?
स्तनांचा कॅन्सर कशामुळे होतो?
कॅन्सर होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जेवढ्या लवकर या आजाराचे निदान होईल तितक्याच लवकर उपचार करून आजार बरा करण्यास मदत होते. शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार आणखीनच गंभीर स्वरूप घेतो. शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढल्यामुळे उपचार करणे काहीवेळा कठीण होऊन जाते. वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यास तातडीने उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या वयात सुद्धा कायमच दिसाल तरुण! दैनंदिन जीवनात केलेल्या ‘या’ गोष्टींचा बदल शरीरासाठी ठरेल जास्त फायदेशीर

स्तनाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीला अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसू लागतात. ही गाठ अजिबात जाणवत सुद्धा नाही. पण कालातंराने गाठ हळूहळू मोठी झाल्यानंतर स्तनांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागतात. या वेदना काहीवेळा अतिशय तीव्र असू शकतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही लक्षणे दिसू लागल्यास कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.

ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

आकार किंवा पोत यांमध्ये बदल:

स्तनांमध्ये कॅन्सरची गाठ झाल्यानंतर सुरुवातीला ती अतिशय नाजूक असते, ज्याचा अजिबात शरीरावर परिणाम दिसून येत नाही. पण कालातंराने पेशी वाढल्यामुळे गाठ मोठी होत जाते आणि स्तनांमध्ये वेदना वाढतात. स्तनाच्या त्वचेवर सुरकुत्या किंवा स्तनांचा रंग लालसर, स्तन सुजल्यासारखे वाटल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. तसेच स्तनांमधील कोणतेही एक नेहमीपेक्षा जड झाल्यासारखे जाणवत असेल तर चाचणी करून घ्यावी. वारंवार त्वचेवरील खडबडीतपणा आणि खाज इत्यादी गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

स्तनांमधून रक्तस्त्राव:

स्तनांमध्ये कॅन्सरच्या गाठीची वाढ झाल्यानंतर स्त्राव निघण्याची शक्यता असते. शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम दोन्ही स्तनांवर दिसून येतो. पण कॅन्सरची गाठ वाढल्यानंतर कोणत्याही एका स्तनातून रक्तस्त्राव किंवा चिकट पाणी येण्याची शक्यता असते. स्तनांमधून रक्त आल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

फॅट बर्न करण्यासाठी प्रभावी ठरेल ताक! एक ग्लासभर ताकात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ, झपाट्याने कमी होईल पोटावरची चरबी

काखेत गाठ:

स्तनांचा कॅन्सर झाल्यानंतर काखेत वेदना होण्याची जास्त शक्यता असते. स्तनामध्ये गाठ येण्याच्या अगोदर कॉलरबोन किंवा काखेत गाठी येते. या वेदना सुरुवातीला अतिशय सामान्य असतात, पण कालातंराने वेदना खूप जास्त तीव्र होतात आणि स्तनांचे गंभीर नुकसान होते. याशिवाय कॅन्सर झाल्यानंतर झपाट्याने वजन कमी होणे, मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव, पोट फुगल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: काखेत वेदना का होतात?

    Ans: काखेत वेदना होण्यामागे स्नायूंचा ताण, इन्फेक्शन किंवा लिम्फ नोड्सची सूज अशी कारणे असू शकतात. काही वेळा हे गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते.

  • Que: कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

    Ans: जर काखेत सतत वेदना, सूज, गाठ किंवा इतर लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांकडे जावे.

  • Que: काखेतील सूज नेहमीच गंभीर असते का?

    Ans: नाही, सर्वच वेळा ती गंभीर नसते. पण दीर्घकाळ टिकल्यास तपासणी करणे आवश्यक आहे.

Web Title: Constant pain in the armpit dont ignore these breast cancer symptoms at all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Breast Cancer
  • cancer
  • Cancer prevention

संबंधित बातम्या

Cancer Risk : नाईट शिफ्टमधील काम आणि कर्करोगाचा धोका: वैद्यकीय संशोधन काय सांगते, निष्कर्ष काय ?
1

Cancer Risk : नाईट शिफ्टमधील काम आणि कर्करोगाचा धोका: वैद्यकीय संशोधन काय सांगते, निष्कर्ष काय ?

Breast Cancer Awareness: कौटुंबिक इतिहास नाही, लक्षणे नाहीत; तरीही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला सल्ला
2

Breast Cancer Awareness: कौटुंबिक इतिहास नाही, लक्षणे नाहीत; तरीही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..
3

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..

Health Update: कर्करोगाच्या औषधांच्या किमती ७०% घटणार! औषधांच्या विक्रीतील नफ्याच्या मार्जिनवर ३० टक्क्यांची मर्यादा
4

Health Update: कर्करोगाच्या औषधांच्या किमती ७०% घटणार! औषधांच्या विक्रीतील नफ्याच्या मार्जिनवर ३० टक्क्यांची मर्यादा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.