Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? ‘या’ सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे

उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे घसा कोरडा पडणे, तोंडात अल्सर येणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 08:37 AM
कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? 'या' सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे

कडाक्याच्या उन्हामुळे घसा सतत कोरडा पडतो? 'या' सायलेंट किलर आजारांची लागण झाल्यानंतर दिसतात गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

वारंवार घसा कोरडा कशामुळे पडतो?
उन्हाळ्यात दिवसभरात किती पाणी प्यावे?
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर उद्भवणाऱ्या समस्या?

राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानात सतत काहींना काही बदल होत आहेत. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त तहान लागते. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायले जाते. पण काहीवेळा शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे घसा कोरडा पडून जातो. कितीही पाणी प्यायले तरीसुद्धा तहान लवकर जात नाही. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार घामावाटे बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे कडक ऊन आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नियमित भरपूर पाणी प्यावे. २ ते ३ लिटर पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळ्यात Food Poisoning झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, उलट्या- जुलाब थांबण्यासाठी करा घरगुती उपाय

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कडक उन्हात कुठेही जाऊन आल्यानंतर घसा कोरडा पडणे, तहान लागणे, थकल्यासारखे वाटणे, अशक्तपणा, चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. शरीरात दिसून येणारे हेच छोटे बदल गंभीर आजाराचे कारण ठरतात. उन्हात जास्त वेळ बाहेर फिरून आल्यानंतर थकवा, डोकेदुखी किंवा लघवीमध्ये जळजळ, डिहायड्रेशन होते. शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर स्थिती निर्माण होते. चला तर जाणून घेऊया घसा वारंवार कोरडा कशामुळे पडतो.

घसा वारंवार कोरडा पडण्याची कारणे:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरातील पाण्याची आणि आवश्यक क्षारांची पातळी कमी झाल्यामुळे सगळ्यात आधी तोंड कोरडे पडून जाते. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो सुद्धा कमी होऊन जातो. डिहायड्रेशनच्या वाढत्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर वारंवार तहान लागणे, झोपल्यानंतर घसा कोरडा पडणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावेत. कितीही पाणी प्यायल्यानंतर तहान भागत नसेल तर रक्ताची पातळी चेक करावी.

Fatty Liver To Cirrhosis: 35 वर्षांखालील तरुणांचा जीव धोक्यात केवळ एका चुकीमुळे ; आरोग्य तज्ज्ञांचा मोठा खुलासा

शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. पण या विटामिनची पातळी कमी झाल्यानंतर जिभेला कोरडेपणा येणे, तोंडात उष्णतेमुळे मोठे फोड किंवा अल्सर येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. तोंड सुकण्यासोबतच तोंडात जर कोरडेपणा किंवा पांढरा थर वाढत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत आणि विटामिन बी १२ ची पातळी वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उन्हाळ्यात घसा कोरडा का पडतो?

    Ans: उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते (डिहायड्रेशन), त्यामुळे घसा कोरडा पडतो.

  • Que: सतत घसा कोरडा पडणे कोणत्या आजारांचे लक्षण असू शकते?

    Ans: मधुमेह, थायरॉईड, ऍसिडिटी (GERD) किंवा इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे हे लक्षण असू शकते.

  • Que: घसा कोरडा पडू नये यासाठी काय करावे?

    Ans: भरपूर पाणी पिणे, नारळ पाणी, फळांचे सेवन आणि थंड पेय (नैसर्गिक) घेणे फायदेशीर ठरते.

Web Title: Constantly dry throat due to hot summer severe symptoms appear after infection with these silent killer diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका
1

Inflammation मुळे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत? मग आहारात करा ‘हे’ बदल, सूज- वाढत्या वेदनांपासून मिळेल सुटका

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका
2

World Physiotherapy Day: वर्क फ्रॉम होम करून हैराण झाला आहात? सतत बसून काम केल्यामुळे वाढतोय पाठदुखीचा धोका

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व
3

World Physiotherapy Day: हालचालक्षमता आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैयक्तिकृत फिजिओथेरपीचे काय आहे महत्त्व

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल
4

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.