विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी काय खावे
शरीरात कोणत्याही विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे चुकीच्या सवयी फॉलो न करता नेहमी आरोग्यदायी सवय फॉलो करणे आवश्यक आहे. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. शरीरातील विटामिन बी 12 आरोग्यासाठी अतिशय महत्व आहे, कारण हे विटामिन लाल रक्तपेशी आणि डीएनए निर्मिती करण्यासाठी उपयुक्त आहेत. शिवाय यामुळे आतडे म्यूकोसा आणि त्वचेच्या पेशी निरोगी राहतात, चयापचयात सुधारणा होते, चरबी, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स तयार करण्यासाठी विटामिन बी 12 अत्यंत महत्वाचे आहे.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरामध्ये विटामिन बी 12 ची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शिवाय यामुळे सतत थकवा जाणवणे, तोंडात व्रण, विस्मरण, मूड बदलणे, अस्वस्थता, हातापायला सतत मुंग्या येणे, त्वचा पिवळी पडणे, केस पातळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला शरीरात निर्माण झालेली विटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचे आहारात सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
विटामिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित काजूचे सेवन करावे. काजूमध्ये असलेले गुणधर्म विटामिन बी 12c ची कमतरता भरून काढतात. शिवाय काजू पोटातील ऍसिडिटीला प्रतिबंध करतात. दूध आणि काजूचे सेवन केल्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. शिवाय हृदयाच्या आरोग्यासाठी काजू अतिशय प्रभावी आहेत. त्यामुळे नियमित २ किंवा ३ काजूचे सेवन करावे.
अक्रोड आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. अक्रोड खाल्यामुळे शरीरातील विटामिन बी 12 ची कमतरता दूर होते आणि आरोग्य सुधारते. मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड अतिशय पौष्टिक आहे. अक्रोडमध्ये ओमेगा 3 आढळून येते, ज्यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. अक्रोड खाल्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो शिवाय शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
लाईफस्टाईल संबधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
फळांचा रस सगळ्यांचं खूप आवडतो. कोल्ड्रिंक किंवा इतर कोणतेही हानिकारक पेय पिण्यापेक्षा फळांच्या रसाचे सेवन करावे. फळांचा रस घरच्या घरीसुद्धा तयार करता येतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी फळांच्या रसाचे सेवन करु शकता. शरीरात निर्माण झालेली जीवनसत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी फळांच्या रसाचे सेवन करावे.