Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये सडलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! पोट स्वच्छ करण्यासाठी ‘या’ फळांचे करा नियमित सेवन

आतड्यांमध्ये सडलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात कोणत्याही चुकीच्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी फळांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचलेली घाण स्वच्छ होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 29, 2025 | 08:49 AM
आतड्यांमध्ये सडलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर!

आतड्यांमध्ये सडलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर!

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्य जगताना शरीराची पचनक्रिया निरोगी असणे आवश्यक आहे. नेहमीच मन फ्रेश राहण्यासाठी आणि कायम आनंदी राहण्यासाठी सर्वच सतत काहींना काही प्रयत्न करत असतात. निरोगी आरोग्याचे रहस्य शरीराच्या पचनसंस्थेवर अवलंबून असते. मात्र बऱ्याचदा जीवन जगताना केल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या चुका आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. सतत आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेले तणाव, जंक फूडचे अतिसेवन, तेलकट तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडू लागते. गॅस, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. शरीरात फायबरची कमतरता निर्माण झाल्यानंतर पोटासंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी प्रमाणात प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)

स्वयंपाक घरातील ‘हा’ पदार्थ खोकला अपचनावर आहे प्रभावी, पावसाळ्यातील सर्व आजारांपासून राहाल लांब

शरीराची पचनक्रिया बिघडण्यामागे अनेक कारण आहेत. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवणे, मळमळ, जेवणाची इच्छा न होणे, सतत मूड बदलत राहणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये चिटकून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण स्वच्छ होईल.

सफरचंद:

कायम निरोगी आणि दीर्घायुषी जीवनासाठी आहारात सफरचंद खाणे आवश्यक आहे. बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यामध्ये असलेले सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते. सफरचंदामध्ये असलेले नैसर्गिक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक सफरचंद खाल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. सफरचंदमध्ये असलेले पेक्तिन फायबर आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देण्यास मदत करतात.

पपई:

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात नेहमीच पपईचे सेवन करावे. पपई खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. पपईमध्ये आढळून येणारे फायबर आणि पपेन घटक पचनक्रिया सुधारण्यासाठी आवश्यक ठरतात. याशिवाय पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील घाण स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे आठवड्यातून ३ ते ४ वेळा पपईचे सेवन करावे.

अभिनेत्री दीपिका कक्कडला सेकंड स्टेज लिव्हर कॅन्सरचे निदान! जाणून घ्या लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे

अळशीच्या बिया:

अळशीच्या बिया आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. या बियांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अळशीच्या बियांमधील फायबर, ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स आतड्या स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. तसेच अळशीच्या बियामधील लिग्नॅन्स नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. अळशीच्या बिया भाजून त्यांची पावडर गरम पाण्यासोबत तुम्ही खाऊ शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these fruits regularly to cleanse the stomach home remedies for gas healthy fruit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 08:45 AM

Topics:  

  • constipation home remedies
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

ताक पिताना केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतील घातक, जाणून घ्या ताक पिण्याची योग्य पद्धत
1

ताक पिताना केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतील घातक, जाणून घ्या ताक पिण्याची योग्य पद्धत

HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर
2

HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर

दोन्ही ट्यूब बंद तरीही आशेला अंकुर! कामा अँड आल्बलेस रुग्णालयात पहिली एम्ब्रियो ट्रान्सफर
3

दोन्ही ट्यूब बंद तरीही आशेला अंकुर! कामा अँड आल्बलेस रुग्णालयात पहिली एम्ब्रियो ट्रान्सफर

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर
4

शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, आजारांपासून राहाल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.