स्वयंपाक घरातील 'हा' पदार्थ खोकला अपचनावर आहे परिणाम
मागील अनेक वर्षांपासून जेवणातील पदार्थ बनवताना हिंगाचा वापर केला जात आहे. हिंगाचा वापर जेवणात केल्यामुळे पदार्थाची चव वाढते. याशिवाय शरीरासाठी हिंग अतिशय महत्वाचे आहे. हिंगाचा वापर रोजच्या आहारात केल्यामुळे पचन, गॅस, ऍसिडिटी किंवा पावसाळ्यातील साथीचे आजार शरीरापासून लांब राहतील.हिंगामध्ये क्तिशाली अँटीबायोटिक, अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल घटक आढळून येतात. अपचन किंवा ऍसिडिटीची समस्या उद्भवू लागल्यास हिंगाच्या पाण्याचे सेवन केले जाते. आरोग्यासंबंधित सर्वच आजारांवर हिंग अतिशय प्रभावी आहे. पुरुष आणि महिलांचे प्रजनन आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहारात हिंगाचे सेवन करावे. पावसाळ्यात सतत उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांपासून लांब राहण्यासाठी आहारात हिंगाचे सेवन करावे. हिंग आरोग्य सुधारण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – iStock)
पावसाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूमध्ये सर्दी खोकला झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र सतत गोळ्या औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अशावेळी हिंगाचे सेवन करावे. हिंगाच्या सेवनामुळे सर्दी पातळ होण्यास मदत होते. तसेच खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो. आज आम्ही तुम्हाला साथीच्या आजारांपासून लांब राहण्यासाठी आहारात हिंगाचे सेवन कशा पद्धतीने करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हिंग गरम पाण्यात सहज विरघळून जाते. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करून शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात हिंगाच्या पाण्याचे सेवन करावे. हिंग खाल्यामुळे ऍसिडिटी नियंत्रणात राहते, गॅस कमी होतो, अपचनाची समस्या दूर होण्यास मदत होते. पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यास कोमट पाण्यात हिंग मिक्स करून प्यायल्यास पोटदुखीपासून आराम मिळेल. तसेच शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील.
सर्वच स्वयंपाक घरांमध्ये जेवण बनवताना हिंगाचा वापर केला जातो. हिंग जेवणात टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढते, याशिवाय पदार्थाचा सुंगध वाढण्यास सुद्धा मदत होते. पचनास कठीण असलेले पदार्थ बनवताना आवर्जून हिंगाचा वापर करावा. पारंपरिक पदार्थ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी बनवताना हिंगाचा वापर केला जातो. हिंग खाल्यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होतात.
शरीरात वाढलेले पित्त आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी आहारात हिंगाच्या चहाचे सेवन करावे., हिंगाचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, एक ग्लास पाण्यात ले पावडर, सेंधे मीठ आणि चिमूटभर हिंग टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर पाणी टोपात उकळवून घ्या. या चहाचे सेवन केल्यामुळे पित्ताची समस्या दूर होईल. याशिवाय शरीरात दीर्घकाळ साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. वारंवार पोटदुखी होत असल्यास हिंगाच्या चहाचे सेवन करावे.