अभिनेत्री दीपिका कक्कडला सेकंड स्टेज लिव्हर कॅन्सरचे निदान
जगभरात कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहेत. कॅन्सरचे नाव घेतल्यानंतर सुद्धा अनेकांच्या अंगावर काटा येतो शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अभिनेत्री दीपिका कक्कर मागील काही महिन्यांपासून आजाराची असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दीपिकाच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर झाल्याची माहिती तिच्या नवऱ्याने चाहत्यांना दिली होती. रुग्णालयात तिच्या उपचार सुरु आहेत, असे देखील त्याने सांगितले होते. मात्र दीपिकाने आज सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना पुन्हा एकदा दुःखद धक्का दिला आहे.(फोटो सौजन्य – iStock)
दीपिकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे की तिला स्टेज-2 कर्करोग झाला आहे. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात अनेक धक्कादायक बदल दिसून येतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र शरीरात दिसणाऱ्या कोणत्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता शरीराची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. याशिवाय शरीरात अनेक बदल दिसून येतात. कोणत्याही कारणांशिवाय कमी झालेले वजन आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे वजन कमी झाल्यासारखे वाटल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. याशिवाय लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर भूक सुद्धा कमी होऊन जाते. कोणताही पदार्थ पाहिल्यानंतर उलट्या होणे किंवा मळमळ वाटू लागते.
बऱ्याचदा पोटात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र वारंवार पोटाच्या वरच्या भागात वाढलेल्या वेदनाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. यामुळे योग्य वेळी आजारावर उपचार होतील. पोटाच्या वरच्या भागात बऱ्याचदा ऍसिडिटी किंवा अपचन झाल्यामुळे सुद्धा वेदना होऊ लागतात. मात्र या समस्येकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर वारंवार उलट्या किंवा मळमळ होऊ लागते. जेवलेले अन्नपदार्थ पचन होणाऱ्या जास्तीचा वेळ लागतो. याशिवाय शरीराला हानी प[पोहचू लागते. त्यामुळे शरीरात लिव्हर कॅन्सरची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून आराम मिळवावा. दुर्लक्ष केल्यास शरीराचे नुकसान होईल.