Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे

Curry Leaves Benefits: दररोजच्या आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 16, 2026 | 07:00 PM
photo- Yandex

photo- Yandex

Follow Us
Follow Us:
  • वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल
  • कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान
  • वाचा अद्भूत फायदे
कढीपत्ता हा फक्त जेवणाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्यामध्ये असलेले घटक आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला आजारांपासून वाचवण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत करतात. कढीपत्ता हे व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई ने समृद्ध आहे. पोषक तत्वांनी समृद्ध कढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतो. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ४ ते ६ ताजी कढीपत्त्याची पाने चावून खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. हृदयाच्या आरोग्यापासून ते मेंदूच्या आरोग्यापर्यंत आणि अगदी कर्करोगावरही कढीपत्त्याचे अनेक फायदे असल्याचे दिसून आले आहे. कढीपत्ता खाल्ल्याने आणखी कोणते आरोग्यदायी फायदे होतात, जाणून घेऊयात.

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

पचनसंस्था मजबूत होते – कढीपत्त्यामध्ये फायबर आणि अँटी- इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात, जे पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या अनेक पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, यामुळे आतड्या निरोगी राहतात

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त – जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर कढीपत्ता हा एक नैसर्गिक उपाय आहे. त्यातील घटक मेटबॉलिजम रेट वाढवतात आणि फॅट बर्न करण्यास मदत करतात. इतकेच नाही, तर ते गोड खाण्याची इच्छा नियंत्रित करतात ज्यामुळए वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

मधुमेह नियंत्रित करते – कढीपत्त्यामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी नियमितपणे कढीपत्ता चावल्याने ग्लुकोजची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.

हृदयासाठी फायदेशीर – कढीपत्ता कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करतो. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर – कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. त्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या टाळता येतात आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.

केसांसाठी फायदेशीर – कढीपत्ता केस गळणे कमी करण्यास मदत करतो. यामध्ये आयरन, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांना मजबूत करतात आणि केस गळणे थांबवतात. सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने केसांची वाढ सुधारते आणि कोंडा कमी होतो. त्यामुळे केस चमकदार होतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढते – कढीपत्ता खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. कढीपत्त्यामधील व्हिटॅमिन सी, आयरन आणि अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि सर्दी – खोकला सारख्या आजारांपासून बचाव करतात.

कढीपत्ता खाण्याची योग्य पद्धत कोणती?

तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ४-५ कढीपत्त्याची पाने चावून खाऊ शकता किंवा ती पाण्यात उकळून पिऊ शकता. या दोन्ही पद्धती आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. परंतु, जर तुम्हाला आधीपासूनच काही आरोग्याच्या समस्या असतील किंवा तुम्ही कोणतीही औषधे घेत असाल, तर त्यांचा आहारात समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल

Web Title: Curry leaves health benefits for weight loss diabetes and immunity marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • daily health tips
  • diabetes
  • hair care tips

संबंधित बातम्या

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती
1

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे
2

Diabetes Tips : मधुमेहींसाठी सूर्यनमस्कार ठरू शकतो वरदान! जाणून घ्या योग्य वेळ, पद्धत आणि फायदे

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य
3

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ
4

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.