Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

६० वर्षांनंतर पुन्हा एकदा भयानक कीटकाची अमेरिकेत एन्ट्री! जिवंत मांस खाणाऱ्या परजीवीमुळे उडाली सगळीकडे खळबळ

अमेरिकेतील टेक्सासमध्ये 'न्यू वर्ल्ड स्क्रू वर्म' नावाचा एक धोकादायक मांसभक्षक कीटक आढळून आला आहे. ६० वर्षानंतर भयानक कीटकाची चर्चा रंगली आहे. हा कोणताही साधा कीटक नसून जिवंत प्राण्यांच्या आणि माणसांच्या शरीरात जाऊन त्यांचे मांस खाणारा भयानक कीटक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2026 | 10:50 AM
६० वर्षांनंतर पुन्हा एकदा भयानक कीटकाची अमेरिकेत एन्ट्री! जिवंत मांस खाणाऱ्या परजीवीमुळे उडाली सगळीकडे खळबळ

६० वर्षांनंतर पुन्हा एकदा भयानक कीटकाची अमेरिकेत एन्ट्री! जिवंत मांस खाणाऱ्या परजीवीमुळे उडाली सगळीकडे खळबळ

Follow Us
Follow Us:

न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म कीटक भयानक का आहे?
अमेरिकेमध्ये भयानक विषाणूची इन्ट्री.
स्क्रू वर्म अळ्या कोणासाठी आहेत घातक?

भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये काही वर्षांआधी कोरोना विषाणूची साथ आली होती. या महामारीमध्ये संपूर्ण जग उध्वस्त झाले होते. जगाची अर्थव्यवस्था विस्खलित झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा अमेरिकेतील टेक्सासमध्ये ‘न्यू वर्ल्ड स्क्रू वर्म’ नावाचा एक धोकादायक मांसभक्षक कीटक आढळून आला आहे. या कीटकाची संपूर्ण जगभरात मोठी चर्चा रंगली आहे. १९६० च्या दशकात धोकादायक कीटकाचा संपूर्ण नायनाट केला होता, मात्र पुन्हा एकदा ६० वर्षानंतर भयानक कीटकाची चर्चा रंगली आहे. या कीटकाचे नाव ‘न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म’ (New World Screwworm-NWS) असे आहे. ३ जून २०२६ ला टेक्सासमध्ये एका वासराच्या नाभीमध्ये जीवन माणूस खाणाऱ्या अळ्या आढळून आल्या. वासराच्या नाभीमध्ये आढळून आलेल्या अळ्या पाहून संपूर्ण अमेरिकन प्रशासन हादरून गेले आहे. अमेरिकेत ६० वर्षांनंतर पुन्हा एकदा आलेल्या कीटकामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया/istock)

Brain Tumor: मेंदूचे आरोग्य आणि जीवनशैलीचा काय संबंध? काय आहे जोखीम

न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म हा कोणताही साधा कीटक नसून जिवंत प्राण्यांच्या आणि माणसांच्या शरीरात जाऊन त्यांचे मांस खाणारा भयानक कीटक आहे. हा कीटक माणसाचा शत्रू असल्याचे सुद्धा बोलले जाते. या विषाणूला वैद्यकीय भाषेत कोक्लिओमिया होमिनीवोराक्स असे सुद्धा म्हंटले जाते. अमेरिकेमध्ये आढळून आलेला भयानक कीटक उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या ताज्या जखमांमध्ये अंडी घालतो. त्यानंतर या अळ्या माणसाचे जिवंत शरीर पोखरून टाकतात. अमेरिकेमध्ये आढळून आलेल्या अळ्यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म कीटक भयानक का आहे?

सामान्य अळ्या कुजलेल्या प्राण्यांवर किंवा मृत व्यक्तीच्या शरीरावर अळ्या घालतात. पण न्यू वर्ल्ड स्क्रूवर्म जिवंत माणसाच्या शरीरावर अळ्या घालतो. ही माशी केवळ जिवंत मांसावरच नाहीतर उबदार रक्ताच्या प्राण्यांच्या उघड्या जखमांवर सुद्धा अंडी घालते. अंड्यामधून बाहेर पडलेल्या अळ्यांना स्क्रूसारखे तीक्ष्ण हुक्स असतात. ज्या हूक्सच्या मदतीने जिवंत मांसाला फाडतात आणि आतमध्ये पोखरून काढतात. या अळ्या केवळ मृत मांस नाहीतर जिवंत पेशी आणि रक्त पिऊन मोठ्या होतात. रक्त शोषण केल्यामुळे शरीराची स्थिती खालावते. बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे प्राण्यांसह मानवाचा सुद्धा वेदनादायी मृत्यू होतो.

स्क्रू वर्म अळ्या एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्यांकडे पसरणाऱ्या अळ्या नाहीत. प्रौढ मादी माश्या उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या ताज्या जखमांमध्ये अंडी घालतात. या अंड्यामधून बाहेर पडणाऱ्या अळ्या प्राण्याच्या जिवंत मांसावर जगतात. या प्रक्रियेमुळे प्राण्यांच्या महत्वाच्या शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. देशातील सर्वात वाईट प्रादुर्भाव म्हणजे १९७२. या वर्षात USDA ने सांगितल्यानुसार, ९०,००० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली होती. गंभीर अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे केवळ नैऋत्य भागात ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे.

केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी, अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय

२०२५ मध्ये एल साल्वाडोरमधून मॅरीलँडला आलेल्या एका अमेरिकन नागरिकाला स्क्रूवर्मचा संसर्ग झाला होता. हा संसर्ग मानवामध्ये पहिल्यांदाच आढळून आला होता. मानवी शरीरात या अळ्या डोळे, कान, नाक किंवा उघड्या जखमांमधून शरीराच्या आतमध्ये प्रवेश करतात आणि स्नायूंमधील आवश्यक पोषक घटक शोषून घेतात. मानवी शरीरातील रक्त आणि आवश्यक पोषक घटक खाणाऱ्या अळ्यांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘माणूस खाणारा’ कीटक म्हणजे काय?

    Ans: ‘माणूस खाणारा’ म्हणून ओळखला जाणारा हा प्रत्यक्षात एक परजीवी कीटक (Parasite) आहे, जो प्राण्यांच्या किंवा मानवांच्या जखमांमध्ये अंडी घालू शकतो. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या जिवंत ऊतींना नुकसान पोहोचवू शकतात.

  • Que: हा कीटक मानवांसाठी किती धोकादायक आहे?

    Ans: या परजीवीमुळे त्वचेवर जखम, वेदना, संसर्ग आणि गंभीर परिस्थितीत ऊतींचे नुकसान होऊ शकते. वेळेवर उपचार न घेतल्यास समस्या वाढू शकते.

  • Que: या संसर्गाची लक्षणे कोणती असतात?

    Ans: जखमेच्या ठिकाणी वेदना, सूज, लालसरपणा, खाज, रक्तस्राव किंवा जखम भरून न येणे अशी लक्षणे दिसू शकतात.

Web Title: Dangerous flesh eating parasite returns to the us after 60 years sparking nationwide concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 10:50 AM

Topics:  

  • America
  • America news
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी, अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय
1

केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या ‘या’ चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी, अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान
2

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान

FIFA World Cup 2026:  खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! इंग्लंड टीमच्या बेस कॅम्पजवळ थरार; अंधाधुंद गोळीबारात ९ जखमी
3

FIFA World Cup 2026: खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! इंग्लंड टीमच्या बेस कॅम्पजवळ थरार; अंधाधुंद गोळीबारात ९ जखमी

पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी; अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या
4

पिझ्झा डिलिव्हरी ठरली जीवघेणी; अमेरिकेत भारतीय IT इंजिनियरची गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.