केवळ अन्नपदार्थच नाहीतर बसण्याच्या 'या' चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाढते ॲसिडिटी
चुकीच्या पद्धतीने बसल्यास काय होते?
अॅसिडिटी वाढण्याची कारणे?
अॅसिडिटी कमी करण्यासाठी घरगुती उपाय?
दैनंदिन आहारात होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट, अतिमसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे किंवा छातीत जळजळ यांसारख्या समस्या वाढू लागतात, असे सगळ्यांचं वाटते. पण जीवनशैलीत होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. अन्नपदार्थांच्या सेवनासोबतच बसण्याच्या चुकीच्या सवयींमुळे सुद्धा शरीरात अॅसिडिटीचे प्रमाण वाढू लागते. कामाची धावपळ, तासनतास एका जागेवर बसून राहणे, मोबाईलसमोर पाठीला बाक काढून बसने इत्यादी चुकीच्या पोश्चरमुळे पचनाचे आजार होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
Health Tips: हिमोग्लोबिन कमी आहे? रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल रक्ताची कमतरता
शरीरात शारीरिक हालचालींचा अभाव निर्माण झाल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. अन्नपदार्थ पचन न झाल्यामुळे शरीरात अॅसिडिटी, गॅस वाढतो आणि संपूर्ण आरोग्याचं बिघडून जाते. पोट आणि अन्ननलिकेदरम्यान एक स्नायूंचा पडदा किंवा व्हॉल्व्ह असतो, ज्याला वैद्यकीय भाषेत लोअर एसोफेजियल स्फिंक्टर असे सुद्धा म्हंटले जाते. हे व्हॉल्व्ह पोटातील अन्नपदार्थांचे कण उलट्या दिशेने येण्यापासून रोखतात. पण ज्यावेळी व्हॉल्व्हच्या कामात अडथळे निर्माण होतात तेव्हा अॅसिड रिफ्लक्स होऊन शरीरात आम्लपित्ताचा त्रास वाढू लागतो. त्यामुळे वाढत्या अॅसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी बसण्याच्या सवयींमध्ये बदल करावेत.
बऱ्याचदा खुर्चीवर बसताना सरळ न बसता पुढे वाकून, खांदे पाडून किंवा पोटाला पीळ देऊन बसल्यामुळे संपूर्ण शरीराचा भार पोटावर येतो. पोटावर आणि अंतर्गत अवयवांवर प्रचंड भौतिक दाब पडल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ वरच्या दिशेने अन्ननलिकेकडे ढकलले जातात. त्यामुळे अपचन किंवा वारंवार अॅसिडिटी होऊन पचनक्रिया बिघडते. तासनतास एका जागेवर काम करत बसल्यामुळे काहीवेळा मानेच्या नसा किंवा थेट डोकं टेबलावर येते. चुकीच्या स्थितीमध्ये बसल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. दीर्घकाळ एकाच स्थितीमध्ये पडून राहिल्यामुळे अॅसिडची पातळी वाढते आणि अपचनाच्या समस्या वाढू लागतात.
तासनतास पाठीला बाक काढून बसल्यामुळे पोटातील अवयव आकुंचन पावतात. तसेच आतड्यांची नैसर्गिक हालचाल होत नाही. खाल्लेले अन्नपदार्थ वेळेत पुढे न सरकल्यामुळे ते आतड्यांमध्ये तसेच साचून राहते. ज्यामुळे पोटात गॅस होतो. त्यामुळे अॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी जीवनशैलीतील बदलांमुळे पोश्चर सुधारणे सुद्धा आवश्यक आहे. बसताना नेहमी पाठ ताठ, खांदे सैल आणि दोन्ही पावलं एकत्र जमिनीवर टाकावीत. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपची स्क्रीन नेहमी डोळ्यांच्या पातळीवर ठेवावेत. यामुळे मान आणि पाठीवर जास्तीचा दबाव येणार नाही. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपू नये तसेच १५ ते २० मिनिटं हलक्या शतपावल्या कराव्यात. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होते.
Ans: जेवल्यानंतर लगेच वाकून बसणे, दीर्घकाळ खुर्चीवर बसून राहणे किंवा चुकीच्या पोश्चरमध्ये बसणे यामुळे पोटावर दबाव येतो आणि ॲसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
Ans: छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, मळमळ, जडपणा जाणवणे आणि अन्न पचण्यास वेळ लागणे ही सामान्य लक्षणे आहेत.
Ans: होय. जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येऊ शकते, ज्यामुळे ॲसिडिटी आणि जळजळ वाढू शकते.






