दीपिका पादुकोणच्या साडीची किंमत माहित्ये का?
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात दिसली. अभिनेत्रीने अतिशय सुंदर जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये या कार्यक्रमात उपस्थिती लावली. तिचा लुक पाहून अनेकांना ‘हम आपके है कौन’मध्ये निशाची भूमिका साकारणारी माधुरी दीक्षित आठवली. मात्र दीपिकाचे सौंदर्य खूपच खुलून आले होते.
दीपिकाने साडीसोबत गळ्यात पांढऱ्या रंगाचा चोकर घातला होता, जो साडीचे सौंदर्य आणखीनच वाढवत होता. या फंक्शनमध्ये अभिनेत्री बेबी बंपसोबत किलर स्टाईलमध्ये दिसली होती. सोशल मीडियावर चाहत्यांना तिचा लुक खूप भावला आणि गरोदरपणातही तिची फॅशन स्टाइल कमी झालेली नाही याचे कौतुक केले. पण या साडीची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का? (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
दीपिकाच्या साडीची किंमत
दीपिकाने यावेळी जांभळी साडी नेसली आहे ती डिझायनर साडी आहे. इंटरनेटवर त्याची किंमत सुमारे 1.39 लाख इतकी दर्शविण्यात आली आहे. सेलिब्रिटी स्टायलिस्ट शालिना नैथानी आणि अंजली चौहान यांनी ही साडी दीपिकासाठी स्टाईल केली असून दीपिकाचा हा लुक कमालीचा व्हायरल झालाय.
जांभळ्यावर पांढरी भरतकाम
दीपिकाची क्लासी साडी
या नऊ-यार्ड साडीचे डिझाईन ‘हैदराबादच्या चौमहल्ला पॅलेस आणि कराचीच्या चौखंडी मकबऱ्यांच्या 16व्या शतकातील वास्तुकला’ वरून प्रेरित असल्याचे सांगण्यात आले आहे. हे हाताने भरतकाम केलेले मोती, सिल्व्हर जरीनी सजविण्यात आले आहे. ही साडी अत्यंत क्लासी आणि एलिगंट दिसून येत आहे.
साडी तयार करण्यासाठी 3400 तास
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तौरानी साडी कलेक्शनची ही साडी तयार करण्यासाठी 3400 तास लागले. या साडीवरील सर्व कलाकुसर ही हाती करण्यात आली असून त्याला अधिक क्लासी करण्यात आले आहे. तर यासह दीपिकाने जरदौसी सिल्व्हर वर्क करण्यात आलेला जांभळा सिल्व्हर ब्लाऊज घातला आहे.
स्मोकी आईज मेकअप
दीपिकाने या रॉयल साडीसह स्मोकी आईज मेकअप केलाय. तर विंग्ड काजळ आणि लायनर लावत तिचा हा लुक अधिक एलिंगट केलाय. न्यूड लिपस्टिक शेड लावत तिने करारी नजर ठेवत पोझ दिल्या आहेत. गरोदरपणातही स्टायलिश दिसण्यासाठी दीपिकाचा हा लुक नक्कीच कॅरी करता येईल.