दैनंदिन आहारात चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अनेक आहारात अतितेलकट, तिखट किंवा पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन करतात. मात्र नेहमी नेहमी या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तेलकट तिखट पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शिवाय तिखट किंवा तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून गेले नाहीतर बद्धकोष्ठता, गॅस, अपचन इत्याद अनेक समस्या उद्भवू शकतात.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्याचे नुकसान करते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. त्यामध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होऊन आरोग्य बिघडते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्याचे नुकसान होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे आहारात सेवन केल्यास हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढू शकते.
लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा बिस्किट्स खायला खूप आवडत. संध्याकाळच्या चहासोबत किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक लोक बिस्किट्सचे सेवन करतात. पण बिस्किट्समध्ये जास्त प्रमाणात साखर आणि मैद्याचा वापर केला जातो. तसेच यामध्ये पाम तेल असते. पाम तेलाचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचते.
सर्वच ऋतूंमध्ये कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केले जाते. कोल्ड ड्रिंक्स प्याल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो. मात्र नेहमी नेहमी कोल्ड ड्रिंक्स पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढून लिव्हरच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. सतत कोल्ड ड्रिंकचे सेवन केल्यामुळे मधुमेह किंवा हृदयरोगाचे प्रमाण वाढते.
बाजारात सर्वच प्रकारची फळे उपलब्ध असतात. मात्र काहींना नियमित फळांचा रस पिण्याची सवय असते. पण बंद डब्यातील फळांच्या रसाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून आरोग्याला हानी पोहचते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचते. त्यामुळे रोजच्या आहारात फळांचा रस पिण्यापेक्षा ताजी फळे खावीत.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
लहान मुलांना चॉकलेट्स मोठ्या प्रमाणावर आवडतात. पण सत्त चॉकलेट खाल्यामुळे दात खराब होण्याची शक्यता असते. चॉकलेट्स बनवताना पाम तेलाचा वापर केला जातो. पाम तेल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे . या तेलाच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते.