Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे’ पदार्थ खाल्ल्यानंतर अजिबात करू नका पाण्याचे सेवन, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी वायू, बिघडेल शरीराची पचनक्रिया

आंबट फळांचे सेवन केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. पाणी प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे मंदावते आणि आतड्यांमध्ये विषारी वायू तयार होतात. जाणून घ्या कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करू नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 30, 2025 | 08:42 AM
'हे' पदार्थ खाल्ल्यानंतर अजिबात करू नका पाण्याचे सेवन, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी वायू

'हे' पदार्थ खाल्ल्यानंतर अजिबात करू नका पाण्याचे सेवन, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी वायू

Follow Us
Close
Follow Us:
  • कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर पाणी पिऊ नये?
  • जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावे?
  • जेवणानंतर पाणी प्यायल्यास शरीरावर होणारे दुष्परिणाम?

जेवणानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर सगळ्यांचं लगेच पाणी पिण्याची सवय असते. पाण्याच्या सेवनामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि शरीराची पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पण चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यास संपूर्ण शरीराची पचनक्रिया बिघडू शकते. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे शरीरातील पाचक रस पातळ होऊन एन्झाइम्सची कार्यक्षमता कमी होऊन जाते. ज्यामुळे पचनक्रिया मंदावणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, गॅस, ऍसिडिटी इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे जेवणानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. खाल्ले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी शरीराला वेळ लागतो. याशिवाय काही ठराविक पदार्थांच्या सेवनानंतर पाण्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

World Psoriasis Day: स्किन सोरायसिस झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, योग्य उपचार पद्धतीने मिळेल आराम

टरबूज किंवा कलिंगड:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टरबूज किंवा कलिंगड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात.यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन पोटात थंडावा निर्माण होतो. याशिवाय कलिंगडमध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण टरबूज किंवा कलिंगड खाल्ल्यानंतर अजिबात पाणी पिऊ नये. पाण्याच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडू शकते. यासोबतच पोटात जडपणा, पोटफुगी आणि गॅस यांसारख्या उद्भवून पचनक्रिया बिघडेल. त्यामुळे कलिंगड किंवा टरबूज खाल्ल्यानंतर ४० ते ४५ मिनिटांननंतर पाण्याचे सेवन करावे.

केळी:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केळी खायला खूप जास्त आवडतात. केळ्यांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामध्ये असलेले नैसर्गिक साखर, फायबर आणि पोटॅशियम शोषले जाण्यासाठी शरीराला आम्ल आणि एन्झाइम्सची आवश्यकता असते. त्यामुळे केळी खाल्ल्यानंतर लगेच पाण्याचे सेवन करू नये. केळ खाल्ल्यानंतर अर्धा किंवा एक तासाने पाणी प्यावे. केळ खाऊन लगेच पाण्याचे सेवन केल्यास मळमळ, पोटदुखी किंवा जडपणा जाणवू शकतो.

लघवी करताना कायमच जळजळ- वेदना होतात ? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

आंबट फळे:

आंबट फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या फळांमध्ये असलेले विटामिन सी शरीराची गुणवत्ता सुधारतात. पण आंबट फळांचे सेवन केल्यानंतर पाणी प्यायल्यास शरीरात ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या वाढू लागतात. कारण आंबट फळांचे सेवन केल्यानंतर शरीरात आम्लता वाढते आणि त्यानंतर पाणी प्यायल्यास ही आम्लता आणखीनच वाढत जाते. त्यामुळे आंबट फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. आंबट फळांवर पाणी प्यायल्यास आतड्यांचे संतुलन बिघडते आणि पोटात जडपणा जाणवू लागतो.

FAQs (संबंधित प्रश्न)

कोणत्या पदार्थांनंतर पाणी पिऊ नये?

काही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे पचनक्रिया मंदावू शकते किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

जेवण झाल्यावर पाणी कधी प्यावे?

जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पाचक रस पातळ होतात आणि पचन मंदावते.

जेवताना पाणी पिणे योग्य की अयोग्य?

जेवताना एकदम जास्त पाणी पिणे टाळावे. यामुळे पोटातील पाचक रस पातळ होऊ शकतात आणि पचनक्रिया मंदावू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do not consume water at all after eating this food toxic gases will be produced in the intestines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • drinking water tips
  • health care news
  • health issue

संबंधित बातम्या

लघवी करताना कायमच जळजळ- वेदना होतात ? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
1

लघवी करताना कायमच जळजळ- वेदना होतात ? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

‘तासातच मेलो असतो…’, मांस तुटून रक्तात मिसळत होतं, बोटं झाली कडक; Tilak Verma ला कोणता होता आजार?
2

‘तासातच मेलो असतो…’, मांस तुटून रक्तात मिसळत होतं, बोटं झाली कडक; Tilak Verma ला कोणता होता आजार?

जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या जेवल्यानंतर कधी आणि किती वेळाने करावे पाण्याचे सेवन
3

जेवणानंतर लगेच पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या जेवल्यानंतर कधी आणि किती वेळाने करावे पाण्याचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.