(फोटो सौजन्य: Pinterest)
आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव याचा आपल्या शरीरावे वाईट परिणाम होत असतो. आपण आपले शरीर बाहेरून तर स्वछ करतो पण याच्या आतील स्वच्छतेचं काय? जास्त तेलकट आणि मसालेदार अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या आतड्यांमध्ये घाण साचू लागते. यामुळे आतड्यांची हालचाल कठीण होते आणि इतर अनेक आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत आपले आतड्यांची स्वछता राखणे फार महत्त्वाचे बनते. ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरूंनी आतड्यांमधील घाण दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आपल्यासोबत शेअर केले आहेत. चला हे कोणते उपाय आहेत याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या व्यावसायिकांसाठी सेमाग्लुटाइड उपचार प्रभावी !जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती
चुकीच्या खाणाऱ्या सवयींमुळे आतड्यांमध्ये कचरा, घाण जमा होऊ लागते त्याचप्रमाणे काही नैसर्गिक पदार्थांचे सेवन केल्याने ही घाण दूरही होते. यामुळे आतड्यांच्या हालचालींना चालना मिळू शकते. आतडे क्लीन करण्यासाठी तीन पदार्थाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते, हे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊया.
कडुलिंब आणि हळद
जुन्या काळापासून अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून कडुलिंब आणि हळदीचा वापर केला जात आहे. अशात आतड्यांना स्वछ करण्यासाठीही यांचा वापर केला जाईल. यासाठी कडुलिंबाची काही पाने बारीक करा, त्यात थोडी हळद पावडर घाला आणि लहान गोळ्या बनवा. रिकाम्या पोटी याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. कडुलिंब हानिकारक जीवाणू नष्ट करते आणि पचनसंस्था स्वच्छ करते. हळदीसोबत याचा प्रभाव आणखीन चांगला दिसून येईल. यामुळे शरीर स्वच्छ होते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
त्रिफळा सेवन
आवळा, हरद आणि बहेडा या तीन फळांचे मिश्रण म्हणजे त्रिफळा. याचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. सद्गुरूंच्या मते, झोपण्यापूर्वी त्रिफळा पावडर पाणी, दूध किंवा मधासह खाल्ल्यास आतड्यांमधील घाण साफ होईल. यामुळे सकाळी पोट स्वच्छ होते आणि कोलन नैसर्गिकरित्या निरोगी राहते.
एरंडेल तेल
आतडे क्लीन करण्यासाठी एरंडेल तेलाचे सेवन फायद्याचे ठरते. यासाठी अर्धा चमचा कोमट एरंडेल तेल पाण्यात किंवा दुधात मिसळून रात्री प्या. यामुळे शरीरात साचलेली सर्व अशुद्धी हळूहळू बाहेर पडेल. यामुळे आतडे स्वच्छ होण्यास मदत होते आणि हलकेपणाची भावना येते.
या गोष्टीही लक्षात ठेवा
सद्गुरु म्हणतात, या तीन गोष्टींसोबतच, दिवसातून दोनदा शौचालयाला जा आणि जेवणांमध्ये ५ ते ६ तासांचे अंतर ठेवा जेणेकरून तुमच्या शरीराला पचनासाठी पुरेसा वेळ मिळेल. हे सोपे तीन उपाय तुमचे आतडे स्वच्छ ठेवतीलच, शिवाय तुम्हाला अधिक सक्रिय आणि निरोगी बनवण्यास मदत करतील.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






