उन्हाळ्यात बाजारामध्ये आंबे, फणस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. कच्च्या फणसापासून भाजी बनवली जाते. तर पिकलेला फणस खायला गोड आणि रसाळ असतो. फणसामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, पोटॅशियम आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळून येतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंब्यांप्रमाणे फणसाला देखील मोठी मागणी आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटक आढळून येतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फणसापासून बनवलेले पदार्थ खायला आवडतात. पण फणसाचे गरे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये किंवा कोणतेही इतर पदार्थ खाऊ नये असे अनेकदा सांगितले जाते. यामुळे आम्ही आज तुम्हाला फणसाचे गरे खाल्ल्यानंतर नेमके कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया..
फणसाचे गरे खाल्ल्यानंतर ‘हे’ पदार्थ खाणे टाळा:
भेंडीची भाजी खाऊ नये:
पिकलेल्या फणसाचे गरे खाल्ल्यानंतर भेंडीचे सेवन करू नये. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. फणसामध्ये ऑक्सलेट्स आढळून येतात जे भेंडीमध्ये एकत्र झाल्याने आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे फणसाची भाजी किंवा गरे खाल्ल्यानंतर भेंडीची भाजी खाऊ नये.चुकून भेंडीची भाजी खाल्ल्यास त्वचेवर खाज, पुरळ, त्वचेवर जळजळ निर्माण होऊ शकते.
पान खाऊ नये:
पिकलेल्या फणसाचे गरे खाल्ल्यानंतर लगेच पान खाऊ नये. यामुळे ऑक्सलेट्स लोहावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर पान खाऊ नये. २ ते ३ तासांच्या अंतरानंतर तुम्ही पान खाऊ शकता.
[read_also content=”आता तुमचेही गाल दिसतील नैसर्गिक गुलाबी, त्वचा उजळविण्यासाठी सोपा घरगुती उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-make-beetroot-night-hydrating-cream-at-home-539371.html”]
दूध पिऊ नका:
फणस खाल्ल्यानंतर त्याच्यावर लगेच दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे पोट बिघडू शकते. तुम्हाला गॅस, ॲसिडीटी आणि अपचन सारख्या समस्या जाणवू शकतात. तसेच त्वचेवर पांढऱ्या रंगाचे डाग येण्याची शक्यता असते. दुधात असलेले कॅल्शिअम फणसात आढळणाऱ्या ऑक्सलेटवर प्रतिक्रिया देतात, त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. २ ते ३ तासांच्या अंतराने दूध प्यावे.
पपई खाणे टाळावे:
फणस खाल्ल्यानंतर लगेच पपई किंवा इतर फळांचे सेवन करू नये. असे केल्यास पपईमध्ये असलेल्या कॅल्शियमचा परिणाम फणसामध्ये आढळणाऱ्या ऑक्सलेटवर होऊन तुम्ही प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर पपई किंवा इतर कोणत्याही फळाचे सेवन करू नये.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.